जलयुक्त शिवार अभियानाचा जलसंधारण मंत्री घेणार आढावा
By Admin | Updated: May 3, 2017 01:50 IST2017-05-03T01:50:16+5:302017-05-03T01:50:16+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक

जलयुक्त शिवार अभियानाचा जलसंधारण मंत्री घेणार आढावा
वाशिम : जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे हे गुरुवार, ४ मे २०१७ रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जलयुक्त शिवार अभियान व जलसंधारण विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंगळवारी कळविण्यात आले.
प्रा. शिंदे हे ४ मे रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित सभेस उपस्थित राहून जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६, २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये झालेल्या कामांचा आढावा घेणार आहेत. तसेच जलसंधारण विभागाच्या कामांचाही ते यावेळी आढावा घेतील.
त्यानंतर ते जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या जलसंधारणाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.