वर्षाकाठी ५० लाख खर्चूनही लीकेजमुळे पाण्यासाठी बोंबाबोंब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:26 IST2021-02-05T09:26:52+5:302021-02-05T09:26:52+5:30
वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या २८ गावे पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्याच्या या योजनेसाठी मानोरा नगरपंचायत ...

वर्षाकाठी ५० लाख खर्चूनही लीकेजमुळे पाण्यासाठी बोंबाबोंब!
वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या २८ गावे पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्याच्या या योजनेसाठी मानोरा नगरपंचायत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला वार्षिक सरासरी ५० लाख रुपये अदा करते. याच निधीतून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजनेचे वीजदेयक अदा करते. त्यात गतवर्षात त्यांनी ३६ लाख २ हजार ७१२१ रुपये वीजबिलापोटी अदा केले; परंतु एवढा खर्च करूनही मजीप्राची जलवाहिनी वारंवार लीकेज होत असल्याने शहरातील नागरिकांना एक तर शिलकीचा खर्च करून किंवा वणवण भटकंती करून अनेकदा तहान भागवावी लागत असल्याचे वास्तव आहे.
------------------
शहरातील पाणीपुरवठ्याचे वार्षिक बजेट
५०,००,०००
---------------
पाणीपुरवठ्यावरील वर्षाचे वीजबिल
३६,०२,७२१
---------------
पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी
०३
--------------------
लीकेजमुळे २० टक्के पाण्याचा अपव्यय
मानोरा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मजीप्राच्या २८ गावे पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी विविध ठिकाणी वारंवार फुटते. त्यामुळे दरदिवशी हजारो लिटर पाण्याचा अपव्यय यातून होतो. जलवाहिनी वारंवार फुटण्याच्या प्रकारातून मानोरा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकूण पाण्यापैकी साधारण २० टक्क्यांहून अधिक पाण्याचा अपव्यय होतो. तथापि, ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याची तसदी मात्र मजीप्राकडून घेतली जात नाही.
-----
्रशहराला मजीप्राच्या पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी नगरपंचायत वार्षिक सरासरी ५० लाख रुपये मजीप्राला देते. जलवाहिनी फुटत असल्याने पाणीपुरवठा ठप्प होतो. असा प्रकार उन्हाळ्यात घडल्याने पाच ते सहा महिने टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. त्याचे बिल अद्यापही निघाले नाही.
-अमोल राऊत
सभापती (पाणी पुरवठा )मानोरा, न.पं.
---------
कार्ली मार्गावरची स्थिती
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मजीप्राच्या योजनेची जलवाहिनी कार्ली मार्गावर वारंवार फुटते. त्यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होतो आणि नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या ठिकाणी जलवाहिनी जीर्ण झाली आहे काय, किंवा ती उथळ असल्याने वाहतुकीमुळे वारंवार फुटते काय, त्याची शहानिशा करण्याचे प्रयत्न होत नाहीत. केवळ दुरुस्तीचे काम केले जाते.
---------------
दिग्रस मार्गावरचे वास्तव
मानोरा शहरात पाणीपुरवठ्यासाठी जोडलेली जलवाहिनी प्रकल्पापासून विविध गावांतून टाकत दिग्रस मार्गावरील बेलोरा येथून शहरात पोहाचविण्यात आली आहे. बेलोरा येथील अगदी रस्त्याच्या वरील भागांत ही जलवाहिनी असल्याने मार्गावरून धावणाऱ्या वाहनांमुळे फुटून पाण्याचा अपव्यय होत असल्याचे प्रथमदर्शनी जाणवते. जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होतोच शिवाय रस्त्यावर डबके साचते आणि त्यातील घाण पुन्हा जलवाहिनीत शिरते.
===Photopath===
250121\25wsm_2_25012021_35.jpg
===Caption===
लिकेजमुळे पाण्यासाठी बोंबाबोंब !