वाशिम जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा आज

By Admin | Updated: March 21, 2016 01:50 IST2016-03-21T01:50:44+5:302016-03-21T01:50:44+5:30

सर्वसाधारण सभेत मांडला जाणार लेखाजोखा.

Wasim Zilla Parishad's budget meeting today | वाशिम जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा आज

वाशिम जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा आज

वाशिम: मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सोमवार, २१ मार्च रोजी सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. अर्थसंकल्पातून नेमके काय साधले जाणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.
वाशिम जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात दुपारी अर्थसंकल्पीय सभेला सुरुवात होणार आहे. या सभेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम खाते सांभाळणारे चंद्रकांत ठाकरे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात कोणत्या बाबीला प्राधान्य दिले जाणार, कोणत्या योजनांना कात्री लावणार, नावीन्यपूर्ण उपक्रम कोणते राहणार, कुणाला झुकते माप आदी बाबी उद्या स्पष्ट होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार, कोणत्या मार्गाने किती उत्पन्न मिळणार आणि कोणत्या बाबींवर किती खर्च होणार, याचा लेखाजोखा अर्थसंकल्पात मांडला जाणार आहे. अर्थसंकल्पीय सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, सभापती चक्रधर गोटे, सुभाष शिंदे, ज्योतीताई गणेशपुरे, पानुताई जाधव यांच्यासह अधिकारी व पदाधिकार्‍यांची उपस्थिती राहणार आहे.

Web Title: Wasim Zilla Parishad's budget meeting today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.