वाशिमात १.३0 लाखाची चोरी
By Admin | Updated: March 15, 2015 00:52 IST2015-03-15T00:52:57+5:302015-03-15T00:52:57+5:30
आरोपिंविरूद्ध गुन्हा दाखल.

वाशिमात १.३0 लाखाची चोरी
वाशिम : येथील लाखाळा परिसरात असलेल्या दत्तनगरामध्ये अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरी करून १ लाख ३0 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते २ वाजताच्या दरम्यान घडली. याबाबत पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशिम येथील दत्त नगरामध्ये गजानन गायकवाड या शिक्षकाचे घर असून, गायकवाड १३ फेब्रुवारीला सकाळीच रिसोड तालुक्यातील केशवनगर येथे गेले होते. त्यांची पत्नीही शिक्षिका असल्याने त्याही शाळेवर गेल्या होत्या. गायकवाड यांची मुलगी ३ वाजताच्या दरम्यान घरी आली असता तिला घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. तिने सदर बाब आपल्या वडिलास भ्रमणध्वनीवरून सांगितली . याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी र्श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते; मात्र त्याला अपयश आले. अज्ञात चोरट्यांनी घरात असलेल्या कपाटातील ५ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम १0 हजार रुपये असा एकूण १ लाख ३0 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला.