मद्यधुंद ऑटोचालकाची नागरिकांनी केली धुलाई
By Admin | Updated: October 7, 2015 02:22 IST2015-10-07T02:22:11+5:302015-10-07T02:22:11+5:30
दोन मोटारसायकलींना धडक ; चार जखमी.

मद्यधुंद ऑटोचालकाची नागरिकांनी केली धुलाई
मालेगाव (जि. वाशिम): क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून मद्यधुंद अवस्थेत ऑटोरिक्षा चालवून अपघात करणार्या चालकाची नागरिकांनी यथेच्छ धुलाई केल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी अकोला-वाशिम महामार्गावर ४.३0 वाजता दरम्यान घडली. मालेगाव शहरातून जाणार्या अकोला-वाशिम महामार्गावरील स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या एटीएमजवळ मंगळवारी ४.३0 वाजताच्या सुमारास मालेगाव वरुण डोंगरकिन्हीला जात असलेल्या ऑटोरिक्षा (एम. एच. ३७ बी - ६४७९) च्या मद्यधुंद चालकाने आपल्या वाहनात खचाखच प्रवासी भरले. प्रवासी भरल्यानंतर भरधाव वेगाने वाहन चालवून रस्त्याच्या मधोमध ऑटोरिक्षा उलटवली. यामध्ये ऑटोरिक्षातील चार प्रवासी जखमी झाले. ऑटोरिक्षाचा वेग भरधाव असल्याने एटीएमजवळील दोन मोटारसायकलींना जोरदार धडक दिली. या धडकेत मोटारसायकलचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. घडलेला प्रकार घटनास्थळी असलेल्या लोकांनी पाहिल्याबरोबर ऑटोचालकाची मदत करण्यास धाव घेतली. तथापि, तो दारू प्यालेला असल्याचे कळल्याबरोबर नागरिकांनी ऑटोरिक्षाचालकास बेदम मारहाण केली. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी कारवाई झाली नव्हती.