वाशिमवासीयांचा घसा ‘जाम’

By Admin | Updated: July 29, 2014 21:02 IST2014-07-29T21:02:09+5:302014-07-29T21:02:09+5:30

रूग्णांमध्ये वाढ: सर्दी,खोकला व तापाचे थैमान

Washim's throat 'jam' | वाशिमवासीयांचा घसा ‘जाम’

वाशिमवासीयांचा घसा ‘जाम’

वाशिम : ढगाळ हवामान, तापमानातील चढ-उतार आणि पडू लागलेल्या पावसामुळे वाशिमवासीयांचा घसा जाम झाला आहे. गत तिन-चार दिवसांपासून पुण्यात सर्दी खोकला व तापाने थैमान घातले आहे. परिणामी, दखान्यातही रूग्णांची संख्या वाढू लागली असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, जिल्हा रूग्णालय व खासगी रूग्णालयेही हाऊसफुल्ल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

** जून महिन्यात येणारा पाऊस जुलै महिन्यात आल्याने हवामानात मोठे बदल होत आहेत. कधी पाऊस, कधी ढगाळ वातावरण तर कधी उन्हाळ्यालाही लाजवेल असे उन अश्या बदलत्या वातावरणामुळे हवेतील विषाणूंसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आणि याच विषाणूंनी सद्या वाशिमवासीयांवर हल्ला केला आहे.

** प्रामुख्याने हवेतून आणि अन्नातून शरीरात प्रवेश करणार्‍या या विषाणूंमुळे सर्दी, खोकला, ताप येणे, घसादुखी, उलटी, जुलाब या आजारांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. जिल्हा रूग्णालय व खासगी रूग्णालयात दाखल होणार्‍या रूग्णसंख्येवरून ही बाब दिसून येत आहे.

** गत चार दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळेही सर्दी . खोकला, अंगदुखी, पाठदुखी व तापाच्या रूग्णात एकदम वाढ झाली आहे. मात्र डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार योग्य उपचार घेतल्यास हे आजार तात्काळ बरे होऊ शकतात.

** पावसाळ्याच्या दिवसात आजारांपासून बचाव करण्यासाठी गाळलेले पाणी प्या, बाहेरचे तळलेले पदार्थ खाणे टाळा, आंबलेले पदार्थ खाऊ नका असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

** ऋतु बदलला , आहारही बदला
सद्या उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे उन्हाळी आहार बदलून पावसाळी आहार घेण्याकडे वळायला पाहीजे. याला ऋतु संधी असे म्हणतात. उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात घैत असलेली शरबते, थंडपेये, आईस्किम हळूहळू कमी करून गरम पदार्थ म्हणजेच सूप, वरण, आदी पचायला सोपे जाणारे हलके पदार्थ सेवणास सुरूवात करावी त्याच बरोबर उष्ण तिष्ण असलेले सुंठ ,तुळस, काळी मिरी, लवंग या पदार्थांचा आहारातील वापर वाढवावा. असा सल्ला डॉ. पाटील यांनी यावेळी दिला आहे.

** राहा तुळशीच्या सानिध्यात
आगामी काळात शहरात डेंगीची साथ पसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. डेंगीपासून वाचण्यासाठी प्रत्येकाने घराजवळ तुळशीचे झाड लावले पाहीजे. तुळस २४ तास ऑक्सिजन सोडत असल्यामुळे त्यांच्या सानिध्यात राहणार्‍या व्यक्तिंना ऑक्सिजनचा पुरवठा होऊन रक्ताभिसरण वाढेल आणि डेंगीचा आजर होण्यासाठी प्रतिबंध होईल असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

** सर्दी खोकला घालवा काढा पिऊन
सद्या शहरातच नव्हे तर जिल्ह्यात सर्दी खोकल्याचे रूग्ण वाढत आहेत. यातील बर्‍याच रूग्णांना घरच्या घरी काही प्रमाणात या आजारांला प्रतिबंध घालता येऊ शकतो. बेल, तुळस, काळीमिरी, लवंग, दालचिनी, सुंठ ठेचून रात्रभर ४ कप पाण्यात ठेवा सकाळी हे पाणी उकळून त्याचा एक कप काळा करा. आणि त्यामध्ये गुळ घालुन गरम गरम प्या. सर्दी व खोकला कमी होऊन उत्साह दिवसभरासाठी टिकून राहील. या शिवाय पावसात भिजणे, केस ओले ठेवणे , भिजलेले कपडे अंगावर जास्त वेळ ठेवणे आदी बाबीही प्रकर्षाने टाळा असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

Web Title: Washim's throat 'jam'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.