वाशिमचे नारायण व्यास सायकलने गाठणार रामसेतू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST2021-02-05T09:24:30+5:302021-02-05T09:24:30+5:30
शांती व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी नारायण व्यास यांनी यापूर्वी वाशिम ते मुंबई, वाशिम ते वाघा बॉर्डर यासह विविध ठिकाणी ...

वाशिमचे नारायण व्यास सायकलने गाठणार रामसेतू!
शांती व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी नारायण व्यास यांनी यापूर्वी वाशिम ते मुंबई, वाशिम ते वाघा बॉर्डर यासह विविध ठिकाणी सायकलने पोहोचण्याचा विक्रम केलेला आहे. आता ते वाशिमपासून २ हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या रामसेतू येथे सायकलने जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. यासंबंधी माहिती देताना त्यांनी सांगितले की, सिनेसृष्टीत आघाडीचे अनेक अभिनेते आहेत; मात्र समाजकार्यासाठी वाहून घेणारे फार कमी अभिनेते आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात अभिनेते सोनू सूद यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत गोरगरीब, गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यांच्या याच कार्याला सलाम म्हणून आपण समाजकार्याला चालना मिळावी, हा उद्देश समोर ठेवून ‘वाशिम ते रामसेतू’ सायकल प्रवासाचे नियोजन केले आहे. ७ दिवसांत हे अंतर पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.