वाशिमचे ‘बीएलओ’ मानधनापासून वंचित!

By Admin | Updated: February 20, 2016 02:21 IST2016-02-20T02:21:26+5:302016-02-20T02:21:26+5:30

वाशिम तालुक्यातील ‘बीएलओ’ सहा महिन्यांपासून मानधनाची प्रतीक्षा.

Washim's 'BLO' deprived of honor! | वाशिमचे ‘बीएलओ’ मानधनापासून वंचित!

वाशिमचे ‘बीएलओ’ मानधनापासून वंचित!

वाशिम : मतदान नोंदणी अभियानांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून सेवा देणार्‍या वाशिम तालुक्यातील शिक्षकांना सहा महिन्यांपासून मानधनाची प्रतीक्षा आहे. वाशिम तालुक्यातील अनेक शाळेच्या एका शिक्षकावर बीएलओची जबाबदारी सोपविली होती. मतदार नोंदणी व याद्यांमधील दोष दुरुस्ती अभियान यशस्वी करण्यासाठी या शिक्षकांनी कामगिरी बजावली. वाशिमचा अपवाद वगळता अन्य तालुक्यातील शिक्षकांना ह्यबीएलओह्णचे मानधन मिळाले आहे. वाशिम तहसील कार्यालयाने वाशिम तालुक्यातील बीएलओ म्हणून सेवा देणार्‍या शिक्षकांचे मानधन त्वरित अदा करावे, अशी मागणी कास्ट्राइब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशव वैद्य व सरचिटणीस हेमंत तायडे यांनी तहसीलदारांकडे गुरुवारी केली.

Web Title: Washim's 'BLO' deprived of honor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.