शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जि.प.ने घेतला स्वमालकीच्या मालमत्तांचा शोध!

By admin | Updated: April 22, 2017 00:43 IST

अतिक्रमणो हटविणार; त्रिस्तरीय समितीचा अहवाल सादर

वाशिम : ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या मालकीची स्थावर मालमत्ता, भूखंड कुठे आणि किती प्रमाणात आहेत, याचा शोध घेण्यात अखेर जिल्हा परिषद प्रशासनाला यश आले आहे.अकोला जिलच्या विभाजनातून १९९८ साली तयार झालेल्या वाशिम जिल्हा परिषदेकडे त्यांच्या वाट्याची मालमत्ता हस्तांतरीत होणे अपेक्षित होते; मात्र १७ वर्षानंतरही अनेक ठिकाणी महसूल विभागाच्या कागदपत्रांवर अकोला जिल्हा परिषद असा उल्लेख आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेची एकूण स्थावर मालमत्ता किती, याचा कोणताही लेखाजोखा जिल्हा परिषदेकडे नसल्याने अनेक ठिकाणी घोळ झाला. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण व स्थायी समितीच्या सभेत सदस्यांसह पदाधिकार्‍यांनी आवाज उठविला होता. गतऑगस्ट महिन्यात जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी जि.प. मालकीच्या मालमत्तेचा मुद्दा गांभीर्याने घेऊन सामान्य प्रशासन विभागाला समित्या गठीत करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.आता त्रिस्तरीय समितीचे सर्व अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला सादर झाले असून, या अहवालानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. स्थावर मालमत्तेवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी कृती आराखडाही आखण्यात येणार आहे, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.