शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची पोटनिवडणूक : १४ गटासाठी १२३ तर २७ गणांसाठी १९७ उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 11:49 IST

Washim ZP By election : अंतिम मुदतीपर्यंत १४ गटांसाठी १२३, तर २७ गणांसाठी १९७ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

वाशिम : जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २७ गणांसाठी पोटनिवडणूक होऊ घातली असून अंतिम मुदतीपर्यंत १४ गटांसाठी १२३, तर २७ गणांसाठी १९७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडी होईल की नाही? याबाबत साशंकता वर्तविली जात आहे.जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून, पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी १९ जुलै रोजी पोटनिवडणूक होत आहे. २९ जून ते ५ जुलै यादरम्यान उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, शेवटच्या दिवशी अर्थात सोमवार, ५ जुलै रोजी उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला. जिल्हा परिषदेच्या १४ गटांसाठी १२३, तर पंचायत समितीच्या २७ गणांसाठी १९७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. सर्वाधिक उमेदवारी अर्ज उकळीपेन गटातून दाखल झाले आहेत. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. महाविकास आघाडीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असल्याने इच्छुक उमेदवारही संभ्रमात असल्याचे दिसून येते.  आज उमेदवारी अर्जाची छानणी६ जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छानणी होणार आहे. छानणीअंती वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अवैध अर्ज ठरविल्याप्रकरणी ९ जुलैपर्यंत    अपिल करता येणार आहे. अपिलावर १२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १२ जुलै रोजी अशी आहे.

टॅग्स :washimवाशिमElectionनिवडणूकWashim ZPवाशीम जिल्हा परिषद