वाशिम जिल्हा परिषद सभांचा खर्च ४0 लाखांवर!
By Admin | Updated: March 24, 2016 02:46 IST2016-03-24T02:46:21+5:302016-03-24T02:46:21+5:30
सार्वजनिक मालमत्ता परिरक्षणावर १.४२ कोटींचा खर्च : कृषीसाठी केवळ ६0 लाखांचा खर्च.

वाशिम जिल्हा परिषद सभांचा खर्च ४0 लाखांवर!
संतोष वानखडे /वाशिम
मिनी मंत्रालय असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या विविध सभा, सभेस हजर राहण्यासाठी व सदस्यांना प्रवास भत्ता, कायम प्रवास भत्ता, अल्पोपाहार आदी बाबींवर सन २0१५-१६ या दुष्काळी वर्षात ३९ लाख ९१ हजार रुपये खर्च झाल्याची बाब अंदाजपत्रकातून समोर आली आहे. दुसरीकडे याच वर्षात कृषी विभागाच्या योजनांवर केवळ ६0 लाखांचा खर्च झाला.
सन २0१५-१६ च्या सुधारित अंदाजपत्रकात कोणत्या घटकांवर किती खर्च झाला, या आकडेवारीवर नजर टाकली असता, शिक्षणावर ८0 लाखांचा खर्च झाल्याचे दिसून येते. सार्वजनिक आरोग्य या घटकावर ७0 लाखांचा खर्च दाखविण्यात आला. शिक्षण व आरोग्य या प्रमुख विषयांचा एकत्रित विचार केला तर दीड कोटींचा खर्च झाल्याचे दिसून येते. दुसरीकडे सार्वजनिक मालमत्तेचे परिरक्षण या लेखाशीर्षाखाली तब्बल १ कोटी ४२ लाख 0२ हजार ६३५ रुपये खर्च झाल्याचे अंदाजपत्रकात दाखविण्यात आले आहे. शेतकर्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कृषीवर सन २0१५-१६ या वर्षात फक्त ६0 लाखांचा खर्च झाला. जिल्हा परिषदेच्या सभागृहात बहुतांश सदस्य शेतकर्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरतात. शेतकर्यांसाठी २0 ते ३0 लाखांची तरतूद करण्याच्या मागणीसाठी अख्खे सभागृह दणाणून सोडतात. २0१५ या वर्षातील भीषण दुष्काळी परिस्थितीचे वर्णन करून शेतकरी हिताच्या योजनांसाठी भरीव तरतूद करण्याचा प्रश्न लावून धरला जातो. तथापि, या प्रश्नांना म्हणावा तसा ह्यअर्थह्ण मिळत नसल्याचा आरोपही सदस्यांमधूनच होतो. २0१५-१६ या वर्षात ६0 लाख आणि २0१६-१७ या वर्षात २0 ते ३0 लाखांचा खर्च ह्यकृषीह्णवर अपेक्षित आहे.