शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांच्या हंगामातही वाशिम जिल्हा परिषदेला विभागप्रमुखच मिळेनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 11:50 IST

Washim Zilla Parishad : जिल्हा परिषदेसाठी अधिकाऱ्यांची ‘ना’ ही ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अडचणीची ठरत आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  गत १५ दिवसांपासून शासनस्तरावरून अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविली जात आहे. वाशिम जिल्हा परिषदेत विभागप्रमुखांची १० पदे आणि गटविकास अधिकाऱ्यांची चार पदे रिक्त असताना, अद्याप विभागप्रमुख म्हणून वाशिमला कुणीही बदलीवर आले नाही. जिल्हा परिषदेसाठी अधिकाऱ्यांची ‘ना’ ही ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अडचणीची ठरत आहे.ग्रामीण भागाचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत एकूण १६ विभाग आहेत. दिमतीला सहा पंचायत समित्या आहेत. सद्यस्थितीत १६ पैकी तब्बल १० विभागाला कायमस्वरुपी विभागप्रमुख नाहीत तर सहापैकी चार पंचायत समितीला गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी नाहीत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत व स्वच्छता मिशन), बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी,  मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशी १० पदे रिक्त आहेत. सध्या शासनस्तरावरून अधिकाऱ्यांची बदली प्रक्रियेची धूम सुरू आहे. मात्र, जिल्हा परिषदेला अद्याप एकही अधिकारी मिळाले नाहीत. वाशिम जिल्हा परिषदेत येण्यासाठी अधिकारी उत्सुक का नाहीत? याचे आत्मचिंतन होणेही गरजेचे आहे. दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार बदलीचे ठिकाण मिळत असेल तर मग दुर्गम व मागास भागातील जिल्ह्यांचा वाली कोण? असाही प्रश्न आहे. 

ज्येष्ठ, कनिष्ठतेचा मुद्दा !जिल्हा परिषदेतही ज्येष्ठ, कनिष्ठतेचा मुद्दा असून, कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे सर्रास प्रभार सोपविण्यात येतो. कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली ज्येष्ठ अधिकाऱ्यांना काम करावे लागत असल्याने भेदभाव होत असल्याची ज्येष्ठ अधिकाऱ्यांमध्ये भावना आहे. प्रभार सोपविताना ज्येष्ठतेचा विचार करून जिल्हा परिषद प्रशासनाने शासन नियमाची अंमलबजावणी करावी, असा सूर ज्येष्ठ अधिकाऱ्यांमधून उमटत आहे.

टॅग्स :Washim ZPवाशीम जिल्हा परिषदwashimवाशिम