वाशिम जिल्हा परिषद परिसरात वाहतुक व्यवस्थेचा बोजवारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 07:21 PM2020-10-06T19:21:41+5:302020-10-06T19:21:48+5:30

Washim ZP News वाहनचालक कुठेही वाहने उभी करतात

Washim Zilla Parishad area vehicles scaterd everywhere | वाशिम जिल्हा परिषद परिसरात वाहतुक व्यवस्थेचा बोजवारा!

वाशिम जिल्हा परिषद परिसरात वाहतुक व्यवस्थेचा बोजवारा!

Next

वाशिम : जिल्हा परिषद परिसरात वाहतुकीचा बोजवारा उडत असून, बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईदेखील नाही. ‘नो पार्किंग झोन’ची अंमलबजावणी होण्यासाठी पदाधिकाºयांसह जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
 जिल्हा परिषद परिसरातील बेशिस्त वाहनांवर शिस्त ठेवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी ‘नो पार्किंग’च्या रेषा आखण्यात आल्या होत्या. वाहनांकरीता पार्किंगचे नियम आखुन देण्यात आले होते. नो पार्किंगमध्ये वाहने दिसल्यानंतर हवाही सोडण्यात आली होती. परंतू, त्यानंतर कारवाईची मोहिम थंडावली. 
त्यामुळे नो पार्किंगमध्येही वाहने उभी केली जात आहेत. जिल्हा परिषद परिसरात वाहनांकरीता नियमावली ठरवुन देण्यात आलेली असतानाही याचे पालन ना कर्मचाºयांकडून होते ना अन्य नागरिकांकडून होते. पदाधिकारी, कर्मचारी, अधिकाºयांसाठी स्वतंत्र वाहनतळ आहे. बाहेरुन येणाºया नागरीकांकरीता स्वतंत्र वाहनतळ आहे.  परंतु अनेकदा वाहनचालक कुठेही वाहने उभी करतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होवून नाहक त्रास सहन करावा लागतो.  जिल्हा परिषद परिसरात अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या वाहनांकरीता वाहनतळाची सुविधा करण्यात आली. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Washim Zilla Parishad area vehicles scaterd everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.