शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाशीम : मानोरा तालुक्यात पाणी पेटले; पाच तास रास्तारोको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 20:33 IST

मानोरा/दापूरा : मानोरा तालुक्यातील दापूरा येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतानाही, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे पाहून संतप्त गावक-यांनी शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी मानोरा-कारंजा मार्गावरील दापूरा फाट्यावर तब्बल चार तास रास्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देवीजपुरवठा पूर्ववत केल्यानंतर आंदोलन मागे महिलांनी धारण केला रुद्रावता; टपावर चढून रोखली महामंडळाची बस

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा /दापूरा : मानोरा तालुक्यातील दापूरा येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतानाही, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे पाहून संतप्त गावक-यांनी शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी मानोरा-कारंजा मार्गावरील दापूरा फाट्यावर तब्बल पाच तास रास्ता रोको आंदोलन केले. गावक-यांचा रुद्रावतार पाहून प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा पूर्ववत केला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.गत तीन-चार वर्षांपासून दापूरा येथील नगारिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाई निवारणार्थ कायमस्वरुपी उपाययोजना राबविण्याची मागणी गावातील सर्वपक्षीय पुढारी, युवकांनी शासन व प्रशासनदरबारी केली होती. या मागणीचा पाठपुरावादेखील केला. मात्र, कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. सध्या गावात तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना होत नसल्याचे पाहून गावातील गिताबाई रूंदन राठोड यांनी बागायतीसाठी करण्यात आलेली पाईपलाईन ही लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगात आणून दिली. म्हसणीच्या धरणावरून पाण्याची सोय उपलब्ध केली. यासाठी ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राकडून वीजपुरवठा घेण्यात आला. मात्र, या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा प्रशासनातर्फे खंडित करण्यात आला. गत एका महिन्यापासून वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी गावक-यांकडून तहसिलदारांकडे केली जात आहे. मात्र, वीजपुरवठा पूर्ववत होत नसल्याने आणि गावात तिव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने शेवटी शुक्रवारला गावक-यांच्या संयमाचा बांध फुटला. मानोरा-कारंजा मार्गावर दापूरा फाटा येथे सकाळी १० वाजतापासून रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात केली. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर तहसिदार डॉ. सुनील चव्हाण यांनी दुपारी १२ वाजता घटनास्थळ गाठले. यावेळी नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे न देता तहसिलदारांनी मौन धारण केले. ठोस तोडगा निघत नसल्याचे पाहून महामंडळाच्या बसवर चढून महिलांनी बस अडविली. आंदोलन चिघळत असल्याचे पाहून दुपारी ३ वाजताच्या सुमारास वीजजोडणी करण्यात आली. त्यानंतर गावकºयांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी जि.प.सदस्य अनिता राऊत, पंचायत समिती सदस्य मधुसूदन राठोड, गजानन भवाने, शिवसेना सर्कल प्रमुख बाळू राठोड, सरपंच तुळशिराम गावंडे, सरपंच भारत दरेकार, धनराज दिघडे, प्यारेलाल राठोड, शिवसेना शाखा प्रमुख पकंज चव्हाण यांच्यासह महिला, पुरूष, युवकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनWaterपाणी