शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
7
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
8
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
9
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
10
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
11
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
12
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
13
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
14
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
15
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
16
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
17
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
18
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
19
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
20
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी

वाशिम : पीक कर्जमाफीसाठी ‘वेट अँण्ड वॉच’! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 2:09 AM

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकेच्या ६३ हजार ५५८ पैकी आतापर्यंत केवळ ३४२४ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, त्याची टक्केवारी ५.३८ अशी येते.

ठळक मुद्दे राष्ट्रीयीकृत बँकेचे ६ टक्के शेतकरी कर्जमुक्त एकूण ८३ टक्के लाभार्थींना प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकेच्या ६३ हजार ५५८ पैकी आतापर्यंत केवळ ३४२४ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, त्याची टक्केवारी ५.३८ अशी येते. एकूण १ लाख ६४ हजार ५३४ पैकी २८ हजार ३३३ हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, ही टक्केवारी १७.२२ अशी येते. दरम्यान, ९ डिसेंबर रोजी राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख वाशिम जिल्हा दौर्‍यावर येत असल्याने किमान मंत्र्यांनी तरी पात्र शेतकर्‍यांना कधीपर्यंत कर्जमाफी मिळेल यासंदर्भात स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून जोर धरत आहेत.जून २0१७ मध्ये कर्जमाफीच्या मुद्यावरून विविध संघटना तसेच शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफी जाहीर  केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांची र्मयादा घालून कर्जमाफी योजनेची ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्ह्यातील एकूण २ लाख ६0 हजार शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. छानणी व पडताळणीअंती जिल्ह्यातील एक लाख ६४ हजार ५३४ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. यामध्ये राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकेचे ६३ हजार ५५८, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे २१  हजार ८४८ आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ७९ हजार १२८ शेतकर्‍यांचा समावेश आहे. दिवाळीपर्यंत शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, तांत्रिक अडचणीत ही घोषणा पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतरही या ना त्या कारणाने कर्जमाफीचे भिजत घोंगडे सुरूच राहिले. कर्जमाफीची घोषणा होऊन पाच महिन्यांचा कालावधी लोटला; आतापर्यंत शासनस्तरावरून जिल्ह्याला राष्ट्रीयकृत, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती अशा तिनही बँका मिळून एकूण ३0 हजार ८८८ शेतकर्‍यांसाठी २५८ कोटी रुपये प्राप्त झाले. यापैकी २८ हजार ३३३ शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात १३0 कोटी रुपये जमा झाल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. राष्ट्रीयीकृत बँकेच्या ४२२९ पात्र शेतकरी लाभार्थींसाठी २३ कोटी २0 लाख रुपये शासनाकडून जिल्ह्याला प्राप्त झाले असून, त्यापैकी ३३२४ शेतकर्‍यांना १३.१९ कोटी रुपयांच्या आसपास रक्कम कर्जखात्यात वळती करण्यात आली. ही टक्केवारी ५.३८ अशी येते. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या २0६९ शेतकरी लाभार्थींसाठी १३ कोटी ९४ लाख रुपये शासनाकडून जिल्ह्याला प्राप्त झाले. त्यापैकी २0६९ लाभार्थींच्या कर्जखात्यात १३ कोटी ९४ लाख रुपये वळते करण्यात आले.  ही टक्केवारी ९.४0 अशी येते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७९ हजार १२८ शेतकर्‍यांपैकी २४ हजार ५९0 शेतकर्‍यांसाठी शासनाकडून २२0 कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले. त्यापैकी २२ हजार ८४0 शेतकर्‍यांना १0२ कोटी ९४ लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला. राष्ट्रीयीकृत, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती अशा तिनही बँका मिळून मिळून २५५५ शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात येत्या दोन-तीन दिवसांत कर्जमाफीची रक्कम वळती केली जाणार आहे, असे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. अद्याप जिल्ह्यातील एकूण १ लाख ३३ हजार ६४६ अर्थात ८२.७८ टक्के शेतकर्‍यांना कर्जमाफीची प्रतीक्षा असून, कर्जमाफी केव्हा मिळणार, असा प्रश्न शेतकर्‍यांमधून उपस्थित केला जात आहे. राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख हे शनिवार, ९ डिसेंबर रोजी वाशिम जिल्ह्यात आढावा बैठक घेणार आहे. जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या ८२.७८ टक्के शेतकर्‍यांना कर्जमाफी केव्हा मिळेल, याबाबत मंत्र्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून जोर धरत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी