वाशिम : जुलै महिन्यात कोरोनाचा आलेख आणखी घसरला असून, गत १० दिवसांत वाशिम शहरात ४ तर ग्रामीण भागात दोन रुग्ण आढळले. वाशिम तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या तिसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी यापुढेही सतर्क राहावे, असे आवाहन आरोग्य विभाग व तालुका प्रशासनाने केले.जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात गतवर्षी जून महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. दरम्यान दुसºया लाटेत मार्च ते मे महिन्यात वाशिम शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. आॅक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी वेटींगवर राहण्याची वेळ रुग्णांवर आली होती. जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येते. जुलै महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे. ८ ते १७ जुलै या दहा दिवसात वाशिम शहरात चार तर ग्रामीण भागात दोन असे एकूण सहा कोरोना रुग्ण आढळून आले. या दरम्यान कोरोनामुळे एकही मृत्यू नसल्याने शहरवासियांची चिंता बºयाच अंशी कमी होत आहे. रुग्णसंख्येत घट झाल्याने शहरासह तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते.
वाशिम तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 17:06 IST