शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

वाशिम : रास्तभाव दुकानांच्या प्रस्तावांची पुरवठा विभागाला प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 13:31 IST

वाशिम :  विविध कारणांमुळे ३२ गावांतील रास्तभाव दुकाने थांबविण्यात आली असून, तेथे नव्याने निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी महिला स्वयंसहाय्यता बचत गटांकडून मागविलेल्या प्रस्तावांची छाननी तहसिल स्तरावर सुरू आहे. छाननीअंती सदर प्रस्ताव पुरवठा विभागाकडे पाठविले जाणार आहेत.

ठळक मुद्देमहिला स्वयंसहाय्यता बचत गटांकडून मागविलेल्या प्रस्तावांची छाननी तहसिल स्तरावर सुरू आहे. ३२ रास्त भाव दुकानांसाठी किती अर्ज आले, याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाला अद्याप प्राप्त नाही.

वाशिम :  विविध कारणांमुळे ३२ गावांतील रास्तभाव दुकाने थांबविण्यात आली असून, तेथे नव्याने निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी महिला स्वयंसहाय्यता बचत गटांकडून मागविलेल्या प्रस्तावांची छाननी तहसिल स्तरावर सुरू आहे. छाननीअंती सदर प्रस्ताव पुरवठा विभागाकडे पाठविले जाणार आहेत.वाशिम तालुक्यातील वाघोली खुर्द, कुंभारखेडा, धारकाटा, खडसिंग, तांदळी शेवई, बिटोडा तेली, उमरा कापसे, कारंजा तालुक्यातील धनज बु., नागलवाडी, पोहा-१, पिंपळगाव खुर्द, रिसोड तालुक्यातील तपोवन, जायखेडा, पाचांबा, केशवनगर, मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी, यशवंतनगर, मालेगाव तालुक्यातील कुरळा, झोडगा खुर्द, रिधोरा, वरदरी खुर्द, किन्हीराजा, धमधमी, पिंपळशेंडा, पांगरखेडा, मंगरूळपीर तालुक्यातील एकांबा, बालदेव, लावणा, भोतसावंगा, शेलगाव, स्वाशीन, वाडा या ३२ गावांमधील रास्तभाव धान्य दुकानांचे परवाने नव्याने वितरीत करण्यात येणार आहेत. याबाबतच्या सूचना संबंधित ग्रामपंचायत, तहसीलदार कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. रास्तभाव धान्य दुकान चालविण्यासाठी इच्छुक महिला स्वयंसहाय्यता बचत गटांकडून ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०१७ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तहसीलदार कार्यालयात मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची नेमकी किती संख्या आहे, याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाला संबंधित तहसिल स्तरावरून मिळणे अपेक्षीत होते. मात्र, अद्याप तहसिल स्तरावरून माहिती न आल्याने ३२ रास्त भाव दुकानांसाठी किती अर्ज आले, याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाला अद्याप प्राप्त नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखडे यांनी गुरुवारी सांगितले. तहसिल स्तरावर सध्या अर्जाची छाननी सुरू असून, परिपूर्ण व पात्र प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाला लवकरच प्राप्त होणार आहेत. त्यानंतर रास्त भाव दुकानासाठी पात्र ठरलेल्या स्वयंसहायता बचत गटाची निवड केली जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिम