वाशिम :  मंगळवारपासून दहावीची वार्षिक परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 05:16 PM2020-03-02T17:16:08+5:302020-03-02T17:16:13+5:30

२३,२७१ विद्यार्थी हे ८६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा देणार आहेत. 

Washim: SSC annual exam from Tuesday | वाशिम :  मंगळवारपासून दहावीची वार्षिक परीक्षा

वाशिम :  मंगळवारपासून दहावीची वार्षिक परीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाºया माध्यमिक शालांत अर्थात दहावीच्या वार्षिक परीक्षेला ३ मार्चपासून सुरुवात होत आहे. एकूण २३,२७१ विद्यार्थी हे ८६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा देणार असून, गैरप्रकारांवर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनातर्फे भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. 
दहावीची वार्षिक परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी केंद्र प्रमुख तसेच मुख्याध्यापकांच्या बैठका घेण्यात आल्या. जिल्ह्यातील काही परीक्षा केंद्रांवरील कॉपी प्रकरणे लक्षात घेता जिल्हा प्रशासन तसेच शिक्षण विभागाकडून एकूण १२ भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत.  या व्यतिरिक्त पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकाºयांचे पथकही राहणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्तही पुरविण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार न करता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या. जिल्ह्यात दहावीच्या वार्षिक परीक्षेला एकूण २३ हजार २७१ विद्यार्थी बसणार असून, यामध्ये नियमित २०९२२ तर रिपिटर २३४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 
जिल्ह्यातील ८६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिक्षेत्रात परीक्षा कालावधीत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत. 


विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका लिहावी नेटकी..
विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षेची सुरूवात दहावीपासून होते, असे म्हटले जाते. बारावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेचा अनुभव घेतलेला असतो; पण दहावीचे विद्यार्थी मात्र बोर्ड या नावानेच अर्धे घाबरलेले असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची बोर्डाची भीती दूर व्हावी आणि उत्तम पद्धतीने उत्तरे लिहिता यावीत, ‘म्हणून उत्तरपत्रिका लिहावी नेटकी’ असा सल्ला ‘लोकमत’च्या माध्यमातून माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे यांनी दिला.


उत्कृष्ट उत्तरपत्रिकेचे तीन पैलू
अक्षर : समान उंची, योग्य अंतर, शिरोरेषा, डावीकडे-उजवीकडे न झुकू देता उभे सरळ काढलेले अक्षर असावे.
लेखनपद्धती : अभ्यासपूर्ण, संदर्भसंपन्न, अचूकता, स्वत:ची भाषा, व्यवस्थितपणा, आखीव-रेखी, शुद्धता, आकर्षक, विरामचिन्हांचा अचूक वापर.
उत्तरलेखन : प्रस्तावना, मुद्देसुदपणा, वेधक, समास, नेमकेपणा, उपसमास, क्रमांक योग्य असावे.
भाषा कौशल्याच्या दृष्टिने भाषण, संभाषण, श्रवण व लेखन हे चार मुद्दे भाषा कौशल्याच्या दृष्टिने महत्त्वाचे आहेत. वर्षभर विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास हा परीक्षेदरम्यान नियोजित वेळेत आवश्यक त्या प्रश्नानुसार उत्तरपत्रिकेवर उतरवायचा असतो. हे करताना विद्यार्थ्यांनी भाषा कौशल्याच्या पद्धतीचा अवलंब करावा, असे तानाजी नरळे यांनी सांगितले.

Web Title: Washim: SSC annual exam from Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.