शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

वाशिम : अनियमित विद्युत पुरवठा व अन्य समस्यांमुळे शेलुबाजारवासी हैराण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 8:07 PM

शेलुबाजार : येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयात पुर्णवेळ कनिष्ठ अभियंता नसल्यामुळे विद्युतच्या समस्या उद्भवल्या असून त्याकडे महावितरणचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. 

ठळक मुद्देशेलुबाजार कार्यालयाचा प्रभार मंगरुळपीर कनिष्ठ अभियंत्यांकडे कामकाजाच्या वेळेत कार्यालय बंद राहत असल्यामुळे आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार : येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयात पुर्णवेळ कनिष्ठ अभियंता नसल्यामुळे विद्युतच्या समस्या उद्भवल्या असून त्याकडे महावितरणचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. मंगरूळपीर येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत एका महिलेकडे शेलुबाजारचाही प्रभार असून त्या येथे कधीकधीच येतात. ही बाब लक्षात घेवून कायमस्वरूपी अभियंता मिळण्यासह विद्युतच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करा; अन्यथा बंद राहणार्‍या महावितरणच्या येथील कार्यालयाचे कुलूप तोडो आंदोलन करू, असा इशारा अर्जुन भिमराव सुर्वे यांनी २७ डिसेंबर रोजी अधीक्षक अभियंता यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात दिला आहे.शेलुबाजारला स्वतंत्र कनिष्ठ अभियंता नसल्याने येथील कार्यालय कामकाजाच्या वेळेत बंदच असते. परिणामी, नागरिकांना विजेच्या समस्या कुणाकडे मांडाव्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तथापि, शेलुबाजार येथे कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता द्यावा, कार्यालयाचे कामकाम दैनंदिन सुरळीत सुरू करावे. येत्या १५ दिवसांत समस्या निकाली न निघाल्यास कामकाजाच्या वेळेत बंद राहणारे कार्यालय फोडण्यात येईल. नागरिकांच्या या रोषाला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जबाबदार राहील, असा इशारा सुर्वे यांनी दिला आहे.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण