शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

वाशिम : १५ दिवसात केवळ चार तालुक्याचा अहवाल पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 1:42 PM

प्रशासनासमोर विविध तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत त्यामुळे गत १५ दिवसात केवळ चार तालुक्याचा अहवाल पूर्ण होऊ शकला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानापोटी आर्र्थिक मदत मिळण्यासाठी एक लाख २३ हजार पीक विमाधारक शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे अर्ज केले आहेत. या नुकसानग्रस्तांना विमा कंपनीच्या निकषानुसार पीक विमा मंजुर करण्यासाठी प्रशासन शेतकरी संख्या, नुकसान झालेले क्षेत्र, त्याचे प्रमाण आदि माहिती संकलीत करुन अहवाल तयार करीत आहे. ही माहिती संकलीत करताना प्रशासनासमोर विविध तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत त्यामुळे गत १५ दिवसात केवळ चार तालुक्याचा अहवाल पूर्ण होऊ शकला आहे.जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकांसह काढणी केलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानामुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने महसूल व कृषी विभागाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सुचना केल्या. त्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून ८ नोव्हेंबरपर्यंत पिकांचे पंचनामे पूर्ण केले. तथापि, या पंचनाम्यानंतर पीक विमा न भरणाºया आणि पीक विमा भरणाºया शेतकºयांचे स्वतंत्र अहवाल तयार करण्याची कसरत प्रशासनाला करावी लागली. जिल्ह्यात २ लाख ९६ हजार १२५ शेतकºयांनी २ लाख ४ हजार ७८५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा उतरविला होता. त्यातील १ लाख २३ हजार ७६० शेतकºयांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानापोटी विम्याचा लाभ मिळण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले. या अर्जानुसार प्रशासनाने शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामेही केले. यानुसार पीक विमा काढणाºया शेतकºयांपैकी ५६ हजार ५२९ शेतकºयांच्या ३२ हजार ३५८ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील उभ्या पिकांचे, तर १ लाख २६ हजार ६८ शेतकºयांच्या १ लाख ४६ हजार ७२ हेक्टर क्षेत्रातील काढणी केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले. अर्थात पीक विमा काढणाºया एकूण १ लाख ८२ हजार ५९७ शेतकºयांच्या १ लाख ७८ हजार ४३० पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. तथापि, या शेतकºयांना पीकविम्याच्या निकषानुसार मदत देण्यासाठी सर्वकष अहवाल तयार करावा लागत आहे. हा अहवाल विविध प्रपत्रात असून, यासाठी कृषी विभागाची कसरत सुरू आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे दोन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यात उभ्या पिकांचे क्षेत्र वेगळे असून, काढणी पश्चात पिकांचे क्षेत्र वेगळे नमूद करावे लागत आहे.त्यातच हा अहवाल तयार करताना शेतकºयाचे नाव, ओळख क्रमांक गाव, पेरणीचे क्षेत्र, बाधित क्षेत्र ही अचूक माहिती नमूद करावी लागत आहे. हे काम जिकिरीचे असल्याने प्रशासन कार्यालयीन वेळेनंतर अतिरिक्त वेळ यासाठी खर्ची घालत आहे. तथापि, आजपर्यंत केवळ मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा या चार तालुक्यांचेच अहवाल पूर्ण झाले आहेत. अद्याप वाशिम आणि रिसोड या दोन तालुक्यांच्या अहवालासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे.(प्रतिनिधी)पिक विमाधारकांना निर्धारित निकषानुसार निधी मिळावा म्हणून बारकाईने यादया तयार करण्याचे काम करण्यात येत आहे.- ज्ञानेश्वर बोबडेजिल्हा समन्वयक, कृषी पीक विमा कंपनी,वाशिम

नुकसानग्रस्त पीक विमा धारकांच्या यादया तयार करण्यासाठी प्रशासन युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहेत.-शंकरराव तोटावारजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती