शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
4
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
5
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
6
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
7
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
8
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
9
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
10
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
11
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
13
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
14
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
15
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
16
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
17
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
18
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
20
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ

वाशिम : डव्हा यात्रेची तयारी अंतीम टप्प्यात; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पार पडली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 19:28 IST

वाशिम : तालुक्यातील श्रीक्षेत्र डव्हा येथील नाथ नंगे महाराज संस्थानच्या यात्रोत्सवाला येत्या १८ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या यात्रेतील संभाव्य अप्रिय घटना टाळण्यासाठी पूर्वतयारी करण्याबाबत  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने मालेगाव तहसील कार्यालयात २८ डिसेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्दे१८ जानेवारीपासून होणार यात्रेला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तालुक्यातील श्रीक्षेत्र डव्हा येथील नाथ नंगे महाराज संस्थानच्या यात्रोत्सवाला येत्या १८ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या यात्रेतील संभाव्य अप्रिय घटना टाळण्यासाठी पूर्वतयारी करण्याबाबत  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने मालेगाव तहसील कार्यालयात २८ डिसेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय महसूल अधिकारी अभिषेक देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत संबंधित विभागांना उपाय योजनांच्या सूचना देण्यात आल्या. मालेगाव तालुक्यातील डव्हा येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात नाथ नंगे महाराज संस्थानवर भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येते. या यात्रेत राज्यभरातील लाखो भाविक सहभागी होतात. नववर्षातील १८ ते २४ जानेवारी २०१७ दरम्यान ही यात्रा भरविली जाणार आहे. या यात्रेत यावेळी ४ ते ५ लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने दक्षता बाळगण्याच्या उद्देशाने पूर्वतयारीबाबत मालेगाव तहसील कार्यालयात २८ डिसेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे, तहसीलदार राजेश वजिरे यांच्यासह संबंधित सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या यात्रेत यात्रेकरूंच्या सुरक्षेबाबत तयारी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना देण्यात आल्या. यामध्ये यात्रोत्सव काळात भारनियमन न करणे, आगीवर नियंत्रणासाठी अग्नीशमन दलाची गाडी मोकास्थळावर तैनात ठेवणे, यात्रेकरूंसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकणे आदि सूचना पंचायत समिती मालेगावच्या गटविकास अधिकाºयांना देण्यात आल्या. यात्रा कालावधित दंडाधिकारी म्हणून तहसीलदार मालेगाव यांची नियुक्ती करणे, पशूहत्या रोखण्याबाबत पशूसंवर्धन विभागाने सतर्कता बाळगणे, वारंवार संदेश वहनासाठी, नियमबाह्य वीजजोडणी असलेले स्टॉल्स, हॉटेल, दुकानांची तपासणी करून सदर वीज जोडण्या खंडीत करण्यासह शॉर्ट सर्किट न होण्याची खबरदारी वीज वितरणने घेणे, अवैध दारूविक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तत्परतेने कार्यवाही करणे, नारळ फोडण्याच्या जागेवर स्वंयसेवक तैनात करून त्या जागेच्या साफसफाईची काळजी घेणे, मंदीर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे, पार्किंगची व्यवस्था, सुरक्षेसाठी बॅरीगेटस लावणे, शौचासाठी तात्पुरते स्थळ निश्चित करून चर शौचालयाची व्यवस्था करणे, ठिकठिकाणी आरोग्य बूथ ठेवणे, डव्हा गावासह संस्थानकडे जाणाºया रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभाग व जि.प. बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करणे, यात्रोत्सवातील सर्व उपाय योजनांबाबत तहसीलदार व संस्थानिकांनी संबंधित विभागांना पत्रव्यवहार करणे, अन्न व औषधी प्रशासनाने यात्रोत्सव काळात विकल्या जाणाºया खाद्यपदार्थांची तपासणी करणे, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससाठी जागा निश्चित करणे, यात्रोत्सवकाळात गुंड आणि दादागिरी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंध घालणे आदि सुचनांचा समावेश आहे. 

टॅग्स :washimवाशिम