वाशिम न.प. सभापतींची निवडणूक अविरोध
By Admin | Updated: January 3, 2015 01:20 IST2015-01-03T01:20:22+5:302015-01-03T01:20:22+5:30
जिल्हा आघाडी, राष्ट्रवादी व शिवसेनेचा समावेश.

वाशिम न.प. सभापतींची निवडणूक अविरोध
वाशिम : स्थानिक नगर परिषदेची स्थायी समिती सभापतींची निवडणूक अविरोध पार पडली असून, जिल्हा विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेच्या उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार चंद्रकांत भोसले व मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी काम पाहिले. यावेळी नगराध्यक्ष लताताई दत्तात्रय उलेमाले, उपाध्यक्ष मोहम्मद जावेद व शिवसेनेचे गटनेते अशोक हेडा यांची प्रमुख उपस्थिती होती.नगर परिषद सभागृहात पार पडलेल्या या निवडणुकीत जिल्हा विकास आघाडीचे सुप्रिमो आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात बांधकाम सभापती पदासाठी प्रवीण सोमाणी, नियोजन समिती पदासाठी मोतीराम तुपसांडे, महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी शोभाताई गौतम भालेराव, उपसभापती पदासाठी कमलताई समाधान माने, पाणीपुरवठा समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने शोभाताई माधवराव अंभोरे व शिक्षण समिती सभापती पदासाठी कमल (बादशाह) धामणे यांनी नामांकन दाखल केले होते. सर्व सभापती पदासाठी केवळ एक एक नामांकन दाखल असल्यामुळे सदर निवडणूक अविरोध पार पडली. यावेळी स्थायी समिती सदस्य म्हणून आघाडीचे अँड. गुरुनामसिंग गुलाटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सलीम बेनिवाले तर शिवसेनेच्या अश्विनी पत्की यांची अविरोध निवड करण्यात आली.