वाशिम-मंगरूळपीर मतदारसंघात प्रचाराचा रंग अद्याप ‘फिका’च!
By Admin | Updated: October 6, 2014 00:45 IST2014-10-06T00:45:13+5:302014-10-06T00:45:13+5:30
मतदार , कार्यकर्त्यांचे शेतीकामाला प्राधान्य : उमेदवार झाले हतबल.

वाशिम-मंगरूळपीर मतदारसंघात प्रचाराचा रंग अद्याप ‘फिका’च!
मंगरूळपीर (वाशिम) : आगामी १५ ऑक्टोंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला जोमात प्रारंभ झाला असला तरी वाशीम-मंगरूळपीर विधानसभा मतदार संघात अद्यापपर्यंत कुणाच्याच बाजुंनी मतदारांचा कौल दिसुन येत नाही विविध पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते सद्या शेतीच्या कामात व्यस्त असल्याने प्रचाराचा रंग फिक्का पडतांना दिसत आहे.पंचरंगी होणार्या निवडणुकीत कोणाची लॉटरी लागेल हे १५ रोजी होणार्या मतदाना नंतर दिसेल.
पुर्णरचनेत आरक्षीत झालेल्या वाशीम -मंगरूळपीर मतदार संघ राजकीय पुढार्यांना अधिक महत्वाचे वाटत नाही.त्यात आघाडीत बिघाडी व युतीत ताटातुट झाल्यामुळे म तदारांचा उत्साह आढळून येत नाही.शासनाचे अधिकारी प्रत्येक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पाहीजे त्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.परंतु ,आज घडीच्या वा तावरण वरून मतदानाच्या टक्केवारीत मोठी घसरण दिसुन येणार आहे.सध्या सोयाबीन काढणीचा काळ असल्यामुळे शेतकरी सोयाबीनची काढणी करण्याच्या गडबडीत आहेत.विधानसभा निवडणुक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आधी शेती नंतर निवडणुक अशा भुमिकेत मतदार आहे निवडणुकीच्या प्रचारांची रणधुमाळी सुरू झाली असली तरी गावोगावी प्रचारासाठी जाणार्या उमेदवारांना कार्यकर्ते मिळणे दुर्लभ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.गेल्या दोन दिवसांपासुन तालुक्यातील ग्रामीण भागात उमेदवारांनी प्रचार कार्याला सुरूवात केली आहे.मात्र, ज्या पध्दतीने राजकीय वातावरण तापायला पाहीजे त्या पध्दतीचे चित्र दिसुन आले नाही.बहुरंगी लढतीत कोण बाजी मारेल हे मतदाना नंतर स्पष्ट होईल.
ठिकठिकाणची विविध पक्षाची प्रचार कार्यालये कार्यकत्यार्ंविना ओस पडल्याचे दिसुन येत आहे.मत विभाजना मुळे दर वेळेस केली जाणारी आकडेमोड यंदा कुणीच कर तांना दिसून येत नाही.या आखाड्यात मंगरूळपीर तालुका कोणत्या पक्षाला आघाडी देणार ते निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.