वाशिम - पुसद मार्गावर महिंद्रा बोलेरो उलटली
By Admin | Updated: June 6, 2014 00:33 IST2014-06-05T23:51:35+5:302014-06-06T00:33:58+5:30
अजगर्या वळणावर दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात

वाशिम - पुसद मार्गावर महिंद्रा बोलेरो उलटली
पिंपळगाव: येथून जवळच असलेल्या अजगर्या वळणावर दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने महिंद्रा बोलेरा मॅक्सी एम.एच.३0 ए.बी.२७३६ क्रमांकाची गाडी पलटी झाल्याची घटना ४ जून रोजी घडली.
४ जून रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास वाशिमवरुन पुसदकडे जाणार्या महिंद्रा गाडीने पिंपळगाव जवळ अजगर वळण म्हणून समजल्या जाणार्या वळणावर समोरुन येणार्या दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्न केला.त्या प्रयत्नात बोलेरो चालक संतोष जंजाळ रा.मोरगाव ता.जि.अकोला( वय अंदाजे २५) यांचा ताबा सुटल्याने रोडच्या बाजुला असलेल्या नालीत पलटी झाली. गाडीचे यामध्ये मोठया प्रमाणत नुकसान झाले. चालक संतोष जंजाळ व किनर विशाल दिलीप सिरसाठ यांना किरकोळ दुखापत झाली.