शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

वाशिम : कोरोनाकाळात २.२५ लाख गोरगरिबांना मोफत अन्नधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 11:22 AM

Washim News : जिल्ह्यातील २.२५ लाख लाभार्थींसाठी ५० हजार क्विंटल धान्य टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाकाळात गोरगरिबांची गैरसोय होऊ नये याकरिता केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मे, जून या दोन महिन्यांसाठी रेशनचे मोफत धान्य वितरित केले जाणार आहे. जिल्ह्यातील २.२५ लाख लाभार्थींसाठी ५० हजार क्विंटल धान्य टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहे.गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. गतवर्षी संपूर्ण लॉकडाऊन असल्याने केंद्र शासनाने तीन महिन्यांच्या कालावधीसाठी अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना रेशनचे मोफत धान्य वितरित केले होते. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. एप्रिल महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने गोरगरीब लाभार्थींची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य शासनाने एका महिन्यासाठी मोफत धान्य देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी १ मे पासून सुरू केली. याच धर्तीवर केंद्र शासनातर्फेदेखील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटातील कुटुंबांना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी एक किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत २ लाख २५ हजार ९२० कार्डधारकांना ४९ हजार ५०० क्विंटल धान्य उपलब्ध केले जाणार आहे.  रेशन दुकानांमधून धान्य वाटप करताना गर्दी होऊ नये म्हणून दुकानदारांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, अशा सूचना पुरवठा विभागाने दिलेल्या आहेत.

मोफत धान्यासाठी लाभार्थींचा अंगठा नाही कोरोनाकाळात ऑनलाइन पद्धतीने रेशनचे धान्य वितरित झाले तर कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन महिने ‘ई-पॉस’वर केवळ संबंधित दुकानदाराचा अंगठा घेऊन लाभार्थींना धान्य वाटप केले जाणार आहे, असे जिल्हा पुरवठा विभागाने स्पष्ट केले.

जिल्ह्यात ७७६ रेशन दुकाने असून, यापैकी १२ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मे, जून या दोन महिन्यांसाठी रेशनचे मोफत धान्य वितरित केले जाणार आहे. - सुनील विंचनकरजिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम