शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
2
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
3
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
4
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
5
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
6
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
7
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
8
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
9
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स
10
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
11
तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करुन घरात ठेवलंय? CA नितीन कौशिक म्हणतात ही गुंतवणूक नाही तर...
12
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 
13
Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?
14
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
15
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
16
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
17
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
18
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
19
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
20
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

वाशिम : वारा जहाँगिर सिंचन प्रकल्पातील पाण्यासाठी परिसरातील शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 17:11 IST

देपूळ  :  शंभर टक्के सिंचनाच्या हेतुने उभारण्यात आलेल्या वारा जहाँगीर सिंचन प्रकल्पावरील उपश्यावरील बंदी उठवून ५० टक्के पाणी जलसिचंनासाठी वापरण्यासची परवाणगी देवून रब्बी पिकाला जीवनदान द्या नाहीतर  हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई  देण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून गुरुवारी केली.

ठळक मुद्देवाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चासिंचन प्रकल्पावरील उपसा बंदी हटवा नाहीतर नुकसान भरपाई द्या!रब्बीच्या पेरणीनंतर बंदी चुकीची

देपूळ  :  शंभर टक्के सिंचनाच्या हेतुने उभारण्यात आलेल्या वारा जहाँगीर सिंचन प्रकल्पावरील उपश्यावरील बंदी उठवून ५० टक्के पाणी जलसिचंनासाठी वापरण्यासची परवाणगी देवून रब्बी पिकाला जीवनदान द्या नाहीतर  हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई  देण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून गुरुवारी केली. तसेच रब्बी पेरणीनंतर उपश्यावर बंदी आणल्याने शेतकºयांचे मोठे प्रमाणात नुकसानाची संभावना सुध्दा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या पदमा मोतीराम सोनोने,  राजेंद्र सारंगधर गंगावणे यांच्या नेतृत्वाखाली देपूळ परिसरातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून आपबिती कथन केली व आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. वारा जहाँगीर, देपूळ , उमरा शमशोद्दीन, उमरा कापसे, देगाव , काजळंबा , बोरी ही गावे आधीच   दुष्काळग्रस्त आहे.  या भागता शेतकरी आत्महत्यांचेही प्रमाण वाढलेले असल्याने शेतकºयांच्या आर्थिक बळकटीकरणास्तव १७९० हेक्टर सिंचन प्रकल्प वारा येथे उभारण्यात आला होता. या प्रकल्पावर पिण्याच्या पाण्याची मागणी नंसताना केवळ  मुख्यमंत्र्याच्या आदेशान्वये उपसा सिंचनावर बंदी घालण्यात आली . या बंदीमुळे शेतकºयांचे मोठया प्रमाणात नुकसानाची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत.

ही बंदी घालण्यासंदर्भात जर पुर्व कल्पना दिली असती , तर या परिसरात रब्बी पिकाची पेरणी झाली  नसती.  रब्बी पिक अर्ध्यावर असताना पााणी उपसावर बंदी आणल्याने शेतकºयांची पिके सुकू लागल्याने ही पिके धोक्यात आली आहे . सोसाबीन पिकले नाही,  तुरीचे पिक वांझ झाल, े कपासी बोंड अळीने धोक्यात आली.  त्यामुळे कर्ज फेडणे तर सोडा आमचे जगने कठीण होवून बसले असल्याच्या प्रतिक्रीया शेतकरी व्यक्त करीत आहे. 

जिल्हयातील अनेक प्रकल्पातील सिंचन उपश्यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु शेतकºयांनी ज्या प्रकल्पाच्या आधारावर पेरणी केली त्यांनी आता काय करावे असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करीत आहेत. पिकांना पाणी न मिळाल्यास शेकडो हेक्टरवरील पेरणी पूर्णपणे वाया जाणार असल्याने याची नुकसान भरपाई प्रशासनाने देण्याचीमागणी शेतकरी करीत आहेत.

५० टक्के जलसाठा द्या

 प्रकल्पामध्ये असलेल्या जल साठयामधून ५० टक्के जलसाठा सिंचनासाठी वापरण्यास परवानगी दया अन्यथा हेक्टरी ५० हजार रुपये अनूदान दया अशी मागणी पदमा मोतीराम सोनोने , राजेंद्र गंगावणे, शंकर गंगावणे, गजानन गंगावणे यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून शेतकºयांच्यावतीने केली आहे. 

 आमच्या मागण्या गांभिर्य पूर्वक विचार न झाल्यास  व पिक धोक्यात येवून उपासमारीने आमचे जिवन धोक्यात आल्यास त्याला शासन जबाबदार राहील असे वारा, देपूळ ,देगाव, काजळंबा, बोरी, उमरा शम , उमरा कापसे येथील शेतकरी बोलत आहे. 

 

यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे सर्वत्र पाणी टंचाई आहे यात दूमत नाही. पिण्याकरीताही पाणी आवश्यक आहे परंतु शेतात पेरलेले पिकांनाही पाण्याची आवश्यकता पाहता पिके वाचविण्यापुरते तरी पाणी प्रशासनाने घेवू देण्यास हरकत नसावी. असे न झाल्यास शेतकºयांनी व्याजाने, उसनवारीने पैसे घेवून घेतलेले पीक पूर्णपणे नष्ट होईल. प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.        

- पदमा मोतीराम सोनोने, सामाजिक कार्यकर्त्या, देपूळ 

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनDamधरण