लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तालुक्यातील तोंडगाव येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा विनापरवानगी स्थानापन्न केल्याचे कारण समोर करून तो प्रशासनाने जप्त केला. दरम्यान, पुतळा बसविण्याची रितसर परवानगी मिळेपर्यंत देखभाल व संरक्षणाची जबाबदारी आम्ही पार पाडू, जप्त केलेला शिवरायांचा पुतळा परत करा, या मागणीसाठी गावातील सुमारे ५०० महिलांनी शनिवार, १७ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.छत्रपती शिवरायांचा पुतळा परत मिळविण्याकरिता शनिवारी गावातील महिलांनी स्वयंस्फूर्तीने घराबाहेर पडून शिस्तीचा प्रत्यय देत एका रांगेत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्याठिकाणी जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर करण्यात आले. शिवरायांचा पुतळा बसविण्यासंदर्भात प्रशासनाची रितसर परवानगी मिळेपर्यंत देखभाल व संरक्षणाची जबाबदारी आम्ही पार पाडू. हा पुतळा आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी यावेळी महिलांनी केली.
वाशिम : पुतळा परत मिळविण्यासाठी तोंडगावातील महिला धडकल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 20:58 IST
वाशिम : तालुक्यातील तोंडगाव येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा विनापरवानगी स्थानापन्न केल्याचे कारण समोर करून तो प्रशासनाने जप्त केला. दरम्यान, पुतळा बसविण्याची रितसर परवानगी मिळेपर्यंत देखभाल व संरक्षणाची जबाबदारी आम्ही पार पाडू, जप्त केलेला शिवरायांचा पुतळा परत करा, या मागणीसाठी गावातील सुमारे ५०० महिलांनी शनिवार, १७ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
वाशिम : पुतळा परत मिळविण्यासाठी तोंडगावातील महिला धडकल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर!
ठळक मुद्देपरवानगी न घेता स्थापन केलेला पुतळा सद्या शासनजमा आहेरितसर परवानगी मिळेपर्यंत सांभाळ करणार - महिलांनी दिली ग्वाही