तोंडगाव येथे वृक्षांचा वाढदिवस, वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

By admin | Published: July 15, 2017 01:51 AM2017-07-15T01:51:04+5:302017-07-15T01:51:04+5:30

मान्यवरांचा सहभाग : बालाजी गणेश मंडळाचा उपक्रम

In Mandgaon, the tree-plantation program, the tree-plantation program, | तोंडगाव येथे वृक्षांचा वाढदिवस, वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

तोंडगाव येथे वृक्षांचा वाढदिवस, वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तोंडगाव: येथे बालाजी गणेश मंडळाच्यावतीने तोंडगाव फाटा ते तोंडगावपर्यंत मागील वर्षी लावण्यात आलेल्या वृक्षांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच नव्या वृक्षांची लागवड करण्यात आली. मान्यवरांचा उपस्थितीत १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता हा अभिनव उपक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला सोनाली न.शहा वरिष्ठ स्तर न्यायाधीश, बळवंत आरखराव तहसीलदार वाशिम, अभिजित देवगिरीकर कृषी तालुका अधिकारी वाशिम, डॉ. हरीश बाहेती समाजसेवक, अशोक थोरात वनपाल वाशिम सर्कल, मारशेटवार कृषी सल्लागार, अ‍ॅड. आमदने, अ‍ॅड. गजानन मोरे, अ‍ॅड. धनराज पडघान व बालाजी गणेश मंडळाचे सदस्य व समस्त गावकरी मंडळी तोंडगाव उपस्थित होते. बालाजी गणेश मंडळाच्या या उपक्रमांमुळे इतर पर्यावरणप्रेमींचे प्रोत्साहन वाढण्यास मदत होणार आहे.

Web Title: In Mandgaon, the tree-plantation program, the tree-plantation program,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.