वाशिम जिल्ह्यात २५ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:48 PM2020-06-17T12:48:47+5:302020-06-17T12:48:55+5:30
आतापर्यंंत २५ टक्के क्षेत्रावर अर्थात १ लाख हेक्टरच्या आसपास पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वािशम : गत तीन दिवसात जिल्हयात दमदार पाऊस झाल्याने २५ टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या आहेत.
१० जूनपासून कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस पडत आहे. १३ आणि १६ जून रोजी पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. गतवर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात ३ लाख ९५ हजार ३९ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी झाली होती. यावर्षी चार लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. गत आठवड्यात १० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. कृषी विभागाकडे पेरणीचा अद्ययावत अहवाल येणे बाकी असून, आतापर्यंंत २५ टक्के क्षेत्रावर अर्थात १ लाख हेक्टरच्या आसपास पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला. पाऊस समाधानकारक पडल्याने शेतकरी सुखावला असल्याचे दिसून येते.
जमिनीत ओलावा पाहूनच पेरणी करण्याचा सल्ला
दमदार पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीसाठी सज्ज आहेत. जेथे जमिनीत ४ इंच ओलावा आहे, तेथे शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केली. मालेगाव, मंगरूळपीर, रिसोड तालुक्यात अधिक प्रमाणात पेरणीला सुरूवात झाली आहे. जमिनीतील ओलाव्याची खात्री करूनच पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.