वाशिम जिल्ह्यात ६८.१८ टक्के मतदान
By Admin | Updated: June 21, 2014 00:34 IST2014-06-21T00:10:43+5:302014-06-21T00:34:56+5:30
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी वाशिम जिल्ह्यात आज ६८.१८ टक्के मतदान झाले.

वाशिम जिल्ह्यात ६८.१८ टक्के मतदान
वाशिम : विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी जिल्ह्यात आज ६८.१८ टक्के मतदान झाले. निवडणूकीत ४३१0 मतदारांपैकी २९३८ मतदारांनी निवडणूकीचा हक्क बजावला. य्सर्वाधिक ७८.७ टक्के मतदान कारंजा तालुक्यात झाले. तर तर सर्वात कमी ६२.१२ टक्के मतदान रिसोड तालुक्यात झाले. वाशिम मध्ये ६५.३५, मालेगाव तालुक्यात ६७.१४, मानोरा तालुक्यात ६६.६0 तर मंगरूळपीर तालुक्यात ७0.७७ टक्के मतदान झाले.