पोषण महिना उपक्रमाच्या नोंदीत वाशिम जिल्हा १९ व्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 01:51 PM2019-09-04T13:51:52+5:302019-09-04T13:52:08+5:30

वाशिम जिल्ह्यात राज्यात १९ व्या क्रमांकावर आहे.

Washim District ranks 19th in Nutrition Month Activities Records | पोषण महिना उपक्रमाच्या नोंदीत वाशिम जिल्हा १९ व्या क्रमांकावर

पोषण महिना उपक्रमाच्या नोंदीत वाशिम जिल्हा १९ व्या क्रमांकावर

Next

वाशिम : राष्टÑीय पोषण महिना उपक्रमात ३ सप्टेंबरपर्यंत केलेल्या कामांच्या आॅनलाईन नोंदीमध्ये वाशिम जिल्ह्यात राज्यात १९ व्या क्रमांकावर आहे. या उपक्रमांतर्गत ३० सप्टेंबरपर्यंत नियोजित वेळापत्रकानुसार कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
पोषण अभियान अंतर्गत ३ सप्टेंबर रोजी बालकांचे पहिले १००० दिवस या विषयावर जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रामध्ये चर्चा झाली. गावातील गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता व कुटुंबातील इतर व्यक्ती यांना मार्गदर्शन केले तसेच अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेत औषधीचे वाटप केले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे रक्त नमुने घेण्यात आले. ४ सप्टेंबर रोजी तालुका व जिल्हास्तरीय सभा, ५ सप्टेंबर रोजी गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, किशोरवयीन मुली व ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण व आरोग्य तपासणी, ६ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय आरोग्य शिबिर याप्रमाणे ३० सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रम व उपक्रम जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनात राबविले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण अधिकारी नितीन मोहुर्ले यांनी दिली.
दरम्यान, विविध कार्यक्रम राबविल्यानंतर त्याच्या नोंदी त्याच दिवशी आॅनलाईन कराव्या लागत आहेत. ३ सप्टेंबरपर्यंत या नोंदीत वाशिम जिल्हा राज्यात १९ व्या क्रमांकावर होता. दैनंदिन कार्यक्रम व आॅनलाईन नोंदीला वेग देण्याच्या सूचना मीना यांनी दिल्या.(प्रतिनिधी)

 

Web Title: Washim District ranks 19th in Nutrition Month Activities Records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम