वाशिम जिल्ह्यात २५00 मेट्रीक टन युरिया

By Admin | Updated: September 6, 2014 00:04 IST2014-09-05T23:50:33+5:302014-09-06T00:04:30+5:30

वाशिम जिल्ह्यासाठी २५00 मेट्रीक टन युरियाचा पुरवठा.

Washim district has 2500 metric tonnes of urea | वाशिम जिल्ह्यात २५00 मेट्रीक टन युरिया

वाशिम जिल्ह्यात २५00 मेट्रीक टन युरिया

वाशिम : जिल्ह्याला ६ सप्टेंबर रोजी २५00 मेट्रीक टन युरिया प्राप्त होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. युरिया प्राप्त होणार असला तरी संभाव्य धोका लक्षात घेता सोयाबीनला युरियाचा डोज देऊ नये, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी व आत्माचे प्रकल्प संचालक विजयराव चव्हाळे यांनी दिला आहे. गत १0 दिवसांपासून जिल्ह्यात बर्‍यापैकी पाऊस पडत आहे. पावसापासून निसर्गत: थोडे बहुत नत्र पिकांना मिळत आहे. पाऊस व नत्र यामुळे पिकांची वाढ जोमाने सुरू आहे. सोयाबीन पीक फुलोरा अवस् थेत आहे. सोयाबीनला युरिया या खताची मात्रा दिल्यास केवळ पिकांचीच वाढ अधिक होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

Web Title: Washim district has 2500 metric tonnes of urea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.