शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

वाशिम जिल्ह्यात स्मार्ट ग्राम निवडीसाठी मुहूर्त मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 2:19 PM

स्मार्ट ग्राम निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा स्मार्ट ग्राम निवडीसाठी तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींचे पुनर्मुल्यांकन करावयाचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यात तालुका स्मार्ट ग्राम निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा स्मार्ट ग्राम निवडीसाठी तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींचे पुनर्मुल्यांकन करावयाचे आहे. तथापि, यासाठी वारंवार तारखेत बदल करूनही ही प्रक्रिया अद्याप पार पाडता आली नाही.पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अर्थात 'इको व्हिलेज' ही योजना शासनाने बंद करीत नव्या स्वरूपात 'स्मार्ट ग्राम'ही योजना साकारली आहे. स्मार्ट ग्राम योजनेत तालुकास्तरावर निवडीसाठी ग्रामपंचायतींना नमुद निकषानुसार स्व-मुल्यांकन करून गुणांकन देण्यात येते. या योजनेत सहभाग घेवू इच्छिणाच्या संबंधित ग्रामपंचायती स्व-मुल्यांकन करून त्यांचे प्रस्ताव संबंधित पंचायत समिती कार्यालयांस पाठवतात. प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींच्या एकूण स्व-मुल्यांकन प्रस्तावांपैकी अधिक गुण प्राप्त २५ टक्के ग्रामपंचायतीची तालुका तपासणी समिती तपासणी करुन त्यांना गुणांकन देते. तालुकास्तरावरील सर्वाधिक गुण प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतीची तालुका स्मार्ट ग्राम म्हणून निवड करून ती ग्रामपंचायत जिल्हा स्तरावरील द्वितीय स्पर्धेकरीता पात्र ठरते. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात २०१८-१९ साठी सहा तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.या मानोरा तालुक्यातील गिरोली, कारंजा तालुक्यातील विळेगाव, मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा, वाशिम तालुक्यातील काटा, रिसोड तालुक्यातील बिबखेडा आणि मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींचे पुर्नमुल्यांकन करून जिल्हा स्मार्ट ग्राम निवडण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्मार्ट ग्राम तपासणी समितीचे अध्यक्ष यांनी जिल्हा तपासणी समितीचे सदस्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, कृषी विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता जि.प. बांधकाम विभाग, तसेच कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जि.प. वाशिम यांना सुचित केले. त्यानंतर ३१ मे रोजी पूर्व नियोजित तपासणीची तारिख बदलून सहा ग्रामपंचायतींसाठी गिरोली आणि विळेगावसाठी १ जुन, सायखेडा, काटासाठी ४ जून, तर बिबखेडा आणि ढोरखेडासाठी ६ जून २०१९ ची तारिख निश्चित करण्यात आली. यासाठी ग्रामपंचायतींनी तयारीही केली; परंतु या तारखेत ७ आॅगस्ट रोजी बदल करून गिरोली, विळेगाव आणि सायखेडा ११ आॅगस्ट, तर काटा, बिबखेडा आणि ढोरखेडासाठी १२ आॅगस्ट तारीख निश्चित करण्यात आली. त्यापूर्वीच ९ आॅगस्ट रोजी पुन्हा पुनर्मुल्यांकनासाठी तपासणीच्या तारखेत बदल करून गिरोली, विळेगाव आणि सायखेडा १३ आॅगस्ट, तर काटा, बिबखेडा आणि ढोरखेडासाठी १४ आॅगस्ट तारीख निश्चित करण्यात आली. या तारखेलाही तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींचे मुल्यांकन करण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींनी तपासणीसाठी केलेली तयारी व्यर्थ ठरली आहे.दोन महिन्यांत तीन वेळा तारखांत बदलतालुकास्तरावर स्मार्ट ग्राम योजनेत प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींतून जिल्हा स्तर स्मार्ट ग्राम निवडीसाठी पुनर्मुल्यांकनाच्या तारखेत दोन महिन्यांत तीन वेळा बदल करण्यात आला. त्यामुळे तालुकास्तरावर प्रथम आलेल्या स्मार्ट ग्रामपंचायतींनी पुनर्मुल्यांकनासाठी केलेली तयारी व्यर्थ ठरली आहे. पुनर्मुल्यांकनाच्या तारखेत वारंवार होणाऱ्या बदलामुळे तालुकास्तर स्मार्ट ग्रामपंचायतीतही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, ही प्रक्रिया तातडीने पार पाडली जावी, अशी अपेक्षा संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य व गावकरी मंडळीकडून व्यक्त होत आहे.

जिल्हास्तर स्मार्ट ग्रामनिवडीसाठी तालुका स्मार्ट ग्रामच्या पुनर्मुल्यांक नाची प्रक्रिया काही कारणांमुळे प्रलंबित ठेवावी लागली. तथापि, लवकरच ही प्रक्रिया पूर्ण पार पाडण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सुचना संबंधित सहा ग्रामपंचायतींना देण्यात येतील.- दीपक कुमार मीनामुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद, वाशिम

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना