वाशिम जिल्हापरिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या

By Admin | Updated: May 22, 2014 23:37 IST2014-05-22T21:00:42+5:302014-05-22T23:37:13+5:30

बदल्यांची प्रक्रिया सभागृहात प्रोजेक्टर लावून स्क्रीनवर पर्याय दाखवून अत्यंत पारदर्शकतेने पार पाडण्यात येणार आहे

Washim District Council Staff Transfers | वाशिम जिल्हापरिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या

वाशिम जिल्हापरिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या

वाशिम: राज्यातील जिल्हापरिषदांमधील कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्याबाबतच्या राज्यशासनाच्या आदेशानुसार वाशिम जिल्हापरिषदेतील शिक्षक वगळता अन्य संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया शुक्रवार २३ मे रोजी सकाळी ११ वाजतापासून जिल्हापरिषदेच्या इमारतीमधील स्व.वसंतराव नाईक सभागृहात सुरू केली जाणार आहे. वाशिम जिल्हापरिषदेतील शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया अद्यापपर्यत पुर्ण झाली नसल्यामुळे शुक्रवार २३ म े रोजी होणार्‍या बदल्यांच्या प्रकियेमध्ये शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार नाहीत.या प्रक्रियेत जिल्हापरिषदेच्या विविध विभागांमधील कार्यालयीन अधीक्षक ,वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक , ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी,आरोग्यसेवक, आरोग्यसेविका व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार्‍या या बदल्यांच्या प्रक्रियेच्या वेळी सर्व खातेप्रमुख , अधिकारी व कर्मचार्‍यांची उपस्थिती राहणार आहे.आज (दि.२२) पासून विधानपरिषदेच्या अमारावती शिक्षक मतदारसंघाच्या २0 जून रोजी होणार्‍या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.तथापि, या बदल्यांची प्रक्रिया अधीच सुरू झालेली असून त्या समुपदेशनाने होणार असल्यामुळे शुक्रवार २३ मे रोजी सकाळी ११ वाजतापासून सायंकाळपर्यत ही बदल्यांची प्रक्रिया सभागृहात प्रोजेक्टर लावून स्क्रीनवर पर्याय दाखवून अत्यंत पारदर्शकतेने पार पाडण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हापरिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांनी दिली.

Web Title: Washim District Council Staff Transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.