वाशिम जिल्हाधिकारी कुलकर्णी यांची बदली
By Admin | Updated: March 27, 2015 01:36 IST2015-03-27T01:36:04+5:302015-03-27T01:36:04+5:30
राज्य मानवी हक्क आयोग सचिवपदी निवड.

वाशिम जिल्हाधिकारी कुलकर्णी यांची बदली
वाशिम : जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांची बदली वाशिम येथून झाली असून, त्यांची राज्य मानवी हक्क आयोग सचिवपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी आपल्या कार्यकाळात जिल्हा विकासासाठी मोलाचे कार्य केले. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाला आयएसओ मानांकन यांच्या कार्यकाळातच मिळाले. जिल्हाधिकारी कुलकर्णी ३१ मार्चपर्यंत वाशिम येथेच राहणार आहेत. त्यांच्या जागी अद्याप कोणाचीच निवड झाली नसल्याची माहिती आहे.