अकोला जिल्हा बँकेचे विभाजन करून वाशिम जिल्हा बँक निर्माण करावी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:46 IST2021-08-25T04:46:44+5:302021-08-25T04:46:44+5:30
सहकार आयुक्त, तथा निबंधक सहकारी संस्था, पुणे यांना पाठविलेल्या निवेदनात देवराव राठोड यांनी असे नमूद केले की, अकोला जिल्हा ...

अकोला जिल्हा बँकेचे विभाजन करून वाशिम जिल्हा बँक निर्माण करावी!
सहकार आयुक्त, तथा निबंधक सहकारी संस्था, पुणे यांना पाठविलेल्या निवेदनात देवराव राठोड यांनी असे नमूद केले की, अकोला जिल्हा सहकारी बँक ही मोठी बँक असून, तिची पाळेमुळे विस्तारली आहेत, मात्र आतापर्यंत वाशिम जिल्हा बँक का होत नाही, सहकारी कायद्याचे पालन का होत नाही, नियमानुसार एका जिल्ह्यासाठी एकच बँक असायला हवी., असे असताना अकोला बँकेचे विभाजन अद्यापही का केले नाही, असे प्रश्न देवराव राठोड यांनी निवेदनात मांडले असून, अकोला बँकेचे विभाजन करून बँकेतील ठेवींचे समान हिस्से करावेत. वाशिम जिल्ह्यातील सभासद यांच्या ठेवी कायम ठेवाव्या, बँकेची जिल्ह्यातील मालमत्ता या बँकेकडे ठेवून जिल्हा बँक निर्मितीनंतर निवडणुका होईपर्यंत प्रशासक नेमावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
------------
महिनाभरात कार्यवाही न केल्यास आंदोलन
अकोला जिल्हा बँकेचे विभाजन करून वाशिम जिल्हा बँकेची निर्मिती करणे वाशिम जिल्ह्यातील संचालक आणि बँकेच्या खातेदारांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे सहकार आयुक्तांनी येत्या महिनाभरात दखल घेऊन वाशिम जिल्हा बँक निर्मितीसाठी पावले उचलावीत अन्यथा वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यात आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.