Washim: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले पोहरादेवीत समाधीस्थळी दर्शन
By नंदकिशोर नारे | Updated: October 13, 2023 15:15 IST2023-10-13T15:14:52+5:302023-10-13T15:15:12+5:30
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी ओबीसी जागर यात्रेनिमित्त मानोरा तालुक्यातील बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे आले असता त्यांनी माता जगदंबा देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

Washim: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले पोहरादेवीत समाधीस्थळी दर्शन
- नंदकिशाेर नारे
वाशिम - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी ओबीसी जागर यात्रेनिमित्त मानोरा तालुक्यातील बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे आले असता त्यांनी माता जगदंबा देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी उपखमुख्यमंत्री फडणवीस यांनी संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
बंजारा धर्मगुरु बाबुसिंग महाराज यांची देखील भेट घेतली. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी व ॲड. निलय नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपखमुख्यमंत्री फडणवीस यांनी संत सेवालाल महाराजांच्या समाधी मंदिराच्या बांधकामाची पाहणी देखील केली.