शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

परिवहन महामंडळाच्या गुणतालिकेत राज्यात वाशिम आगार व्दितीय ; सातारा जिल्ह्यातील पलूस प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 13:13 IST

वाशिम : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्यावतीने विविध निकषांचे पालन करून एसटीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या  आगारांच्या गुणतालिकेत वाशिम येथील आगाराने व्दितीय क्रमांक पटकावला आहे.

ठळक मुद्देएस.टी. महामंडळाच्यावतिने २१ निकषावरुन क्रम दिल्या जातो.यामध्ये वाशिम आगाराला १२७ गुण मिळाले असून, ही कामगिरी राज्यात व्दितीय क्रमांकाची ठरली आहे.विशेष म्हणजे वाशिम आगाराने ९०.१२ लाख रुपयांची तूट भरुन काढली.

 - नंदकिशोर नारेवाशिम : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्यावतीने विविध निकषांचे पालन करून एसटीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या  आगारांच्या गुणतालिकेत वाशिम येथील आगाराने व्दितीय क्रमांक पटकावला आहे. या गुणतालिकेत सातारा जिल्ह्यातील पलूस आगार प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती वाशिमचे सहायक कार्यशाळा अधीक्षक रवी अ. मोरे यांनी ८ फेब्रुवारी रोजी दिली. विशेष म्हणजे वाशिम आगाराने ९०.१२ लाख रुपयांची तूट भरुन काढली.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून गुणतालिकेत अधिक उत्पन्न व बचतीमध्ये याहीवेळी वाशिम आगार कायम असल्याचे सांख्यिकी विभागाने केलेल्या क्रमवारीवरुन दिसून येत आहे. एस.टी. महामंडळाच्यावतिने २१ निकषावरुन क्रम दिल्या जातो. यामध्ये प्रमुख निकषामध्ये इंधनावर केलेला खर्च, उत्पन्न आणणे, गाडयांमधील डिझेल बचत, गाडयांचा चांगला वापर केल्याने स्पेअर पार्ट कमी लावणे, अपघात कमी, टायर कमी, जास्तीत जास्त किलोमिटर कमीत कमी गाडया व माणसांमध्ये करण्याचा समावेश आहे. डिसेंबर २०१७ च्या अंती उपरोक्त निकष पूर्ण करणाºया आगारांची गुणतालिका एसटीच्यावतीने नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वाशिम आगाराला १२७ गुण मिळाले असून, ही कामगिरी राज्यात व्दितीय क्रमांकाची ठरली आहे. गतवेळी वाशिम आगाराने १२३ गुण प्राप्त केले होते. यंदा या गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर असलेल्या पलूस आगाराला १३४ गुण आहेत. या गुणतालिकेत राज्यस्तरावर आपला क्रमांक लागावा यासाठी आगार व्यवस्थापक विनोद म. इलमे, सहायक वाहतूक अधिक्षक पी.डी. डायलकर, सहायक कार्यशाळा अधिक्षक रवी मोरे यांच्यासह आगारातील सर्व चालक, वाहक, यांत्रिक, पर्यवेक्षक व कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.महाराष्ट्र  राज्य मार्ग परिवहन महामंडळातून गुणतालिकेत अधिक उत्पन्न व बचतीमध्ये वाशिम आगार व्दितीय असल्याचे सांख्यिकी विभागाकडून कळविण्यात आले आहे. तसे प्रमाणपत्र सुध्दा आगाराला प्राप्त झाले आहे. हे सर्व अधिकारी व कर्मचाºयांच्या मेहनतीमुळे शक्य झाले.- रवी मोरेसहायक कार्यशाळा अधीक्षकवाशिम एस.टी. आगार

टॅग्स :washimवाशिमstate transportराज्य परीवहन महामंडळ