शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

वाशिम : बांधकाम, लघुसिंचन, शिक्षण विभाग रडारवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 02:11 IST

वाशिम :वाशिम जिल्हा परिषदेतील सन २0१२-१३ च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवाल, वार्षिक अनुपालन अहवालाच्या अनुषंगाने तपासणीसाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या विधिमंडळाच्या पंचायतराज समितीने बुधवारी दिवसभर दोन सत्रात शिक्षण, बांधकाम, लघुसिंचन, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक विभाग व शिक्षण विभागावर प्रश्नांची सरबत्ती करून अधिकार्‍यांना फैलावर घेतले.

ठळक मुद्देपंचायतराज समितीने घेतली अधिकार्‍यांची झाडाझडती २५ हजारांचा दंड, वेतनवाढ रोखणारआज पंचायत समितीचा आढावा व ग्रामीण भागात दौरे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :वाशिम जिल्हा परिषदेतील सन २0१२-१३ च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवाल, वार्षिक अनुपालन अहवालाच्या अनुषंगाने तपासणीसाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या विधिमंडळाच्या पंचायतराज समितीने बुधवारी दिवसभर दोन सत्रात शिक्षण, बांधकाम, लघुसिंचन, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक विभाग व शिक्षण विभागावर प्रश्नांची सरबत्ती करून अधिकार्‍यांना फैलावर घेतले. एका अधिकार्‍यावर दंडात्मक तर काही अधिकार्‍यांवर वेतनवाढ रोखण्याची कार्यवाही प्रस्तावित केली जाणार असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. १७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता पंचायतराज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांच्यासह काही सदस्य स्थानिक विश्रामगृहात दाखल झाले. स्थानिक लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांशी अनौपचारिक चर्चा झाल्यानंतर दुपारी १२ वाजतानंतर जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली. अधिकारी वर्ग वगळता सर्वांनाच सभागृहातून बाहेर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. सभागृहाकडे येणारे दोन्ही बाजूचे दरवाजे बंद करून सन २0१२-१३ च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातील परिच्छेदासंदर्भात तसेच वार्षिक अनुपालन अहवालाच्या अनुषंगाने एकूण ५६ आक्षेपांवरील तपासणीला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांना विश्‍वासात न घेता कामे झाल्यासंदर्भात काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्याची माहिती आहे. काही विकासात्मक योजना राबविताना अनियमितता झाल्याचे ताशेरे ओढण्यात आले. तसेच वैयक्तिक योजनेच्या लाभार्थींची निवड करताना जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेणे, लाभार्थी यादीला जि.प. सभेची मंजुरात घ्यावी, यासंदर्भातही सूचना दिल्याची माहिती आहे.शिक्षण, बांधकाम, लघुसिंचन तसेच पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेशी संबंधित प्रश्नांवर संबंधित अधिकार्‍यांची उत्तरे देताना चांगलीच दमछाक झाल्याचे विश्‍वसनीय सूत्र आहे. एका विभाग प्रमुखाला अचूक माहिती सादर न करता आल्याने २५ हजार रुपये दंड तसेच दंडाची नोंद सेवापुस्तिकेत घेणे आणि काही अधिकार्‍यांची वेतनवाढ रोखण्याची कार्यवाहीदेखील प्रस्तावित केल्याची माहिती आहे. समाजकल्याण, महिला व बालकल्याण, कृषी, शिक्षण, बांधकाम आदी विभागाच्या कामकाजात अनियमितता झाल्याचे समितीच्या निदर्शनात आले. यासंदर्भात संबंधितांची साक्षदेखील लावण्यात येणार आहे, असे सांगून कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या समितीचे तपासणीचे कामकाज रात्री ७ वाजेपर्यंत चालले. पहिल्या दिवशी समिती अध्यक्ष आमदार सुधीर पारवे, समिती सदस्य आमदार वीरेंद्र जगताप, आमदार तुकाराम काते, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार चरण वाघमारे, आमदार रणधीर सावरकर, आमदार आर.टी. देशमुख, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार राहुल बोंद्रे, आमदार दत्तात्रय सावंत या दहा आमदारांसह महाराष्ट्र विधान मंडळाचे उपसचिव विलास आठवले, स्थानिक निधी लेखा मुंबईचे संचालक प्रताप मोहिते, ग्रामविकास विभागाचे उपसचिव एम. डी. जाधव, ग्रामविकास विभागाचे उपसंचालक (वित्त) उ.मा. कावडे, विधान भवनाचे अवर सचिव प्रकाशचंद्र खोंदले, विधान भवनाचे कक्ष अधिकारी सचिन बाभळगावकर,  समिती प्रमुखांचे स्वीय सहायक राजेंद्र भानजी, प्रतिवेदक मंगेश कांबळे, प्रतिवेदक विठ्ठल खर्चे, प्रतिवेदक महेंद्र सांगळे, प्रतिवेदक प्रकाश गागरे, लिपिक-टंकलेखक शशिकांत साखरकर, लिपिक-टंकलेखक किशोर आरेकर आदी उपस्थित होते.

तालुकास्तरीय तपासणीसाठी तीन पथक गठितजिल्हा परिषद शिक्षकांची मेडिीकल बिले तीन महिन्यांपासून प्रलंबित असून, याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची अपेक्षा शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.पंचायत समित्या व ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुसंवर्धन दवाखाने तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेशी संबंधित कार्यालयांना १८ जानेवारी रोजी भेटी दिल्या जाणार आहेत. यासाठी तीन चमू गठित केल्या असून, विधानसभा मतदारसंघनिहाय एक चमू दोन तालुक्यांना भेटी देऊन पाहणी करणार आहे. सुरुवातीला पंचायत समिती अधिकार्‍यांची साक्ष, आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर ग्रामीण भागातील कार्यालयांना अचानक भेटी देऊन पाहणी केली जाणार आहे.समिती प्रमुख आमदार सुधीर पारवे यांची चमू कारंजा व मानोरा तालुक्याला भेटी देणार आहे. या पथकात आमदार आर.टी. देशमुख, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासह अन्य आमदारांचा समावेश आहे. मालेगाव, रिसोड तालु्क्यात आमदार भरतशेठ गोगावले, तुकाराम काते व अन्य आमदार तर वाशिम, मंगरूळपीर तालुक्यात आमदार रणधीर सावरकर, राहुल बोंद्रे, चरण वाघमारे व अन्य आमदारांची चमू भेटी देणार आहे.

१७ जानेवारीला लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातील ५६ मुद्यांसंदर्भात संबंधितांची तपासणी व साक्ष घेण्यात आली. कृषी, शिक्षण, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, बांधकाम, लघुसिंचन आदी विभागांच्या कामकाजात प्रचंड अनियमितता आढळून आली. एका अधिकार्‍याला २५ हजारांचा दंड व वेतनवाढ रोखण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे. कामकाजात पारदर्शकता आणून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न आहे. तपासणीदरम्यान दोषी आढळणार्‍यांची गय केली जाणार नाही.- सुधीर पारवे, अध्यक्ष पंचायतराज समिती.

टॅग्स :washimवाशिमzpजिल्हा परिषद