वाशिममध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या!
By Admin | Updated: April 6, 2017 00:35 IST2017-04-06T00:35:19+5:302017-04-06T00:35:19+5:30
जऊळका रेल्वे (जि. वाशिम) : कृषी महाविद्यालयात शिकणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थीनीने अंगावर ब्लेड मारून घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली.

वाशिममध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या!
जऊळका रेल्वे (जि. वाशिम) : कृषी महाविद्यालयात शिकणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थीनीने अंगावर ब्लेड मारून घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली.
आमखेडा येथील कृषी महाविद्यालयात तेलंगणामधील शक्तीपेठ बोधन येथील आशिता सोनकांबळे (२३) ही व्दितीय वर्षाला शिकत होती. आशिताने स्वत:च्या अंगावर धारदार ब्लेडने वार करुन स्वत:ला जखमी केले. हा प्रकार लक्षात येताच तिला वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. याप्रकरणी प्राचार्य सुनील सातपुते यांनी जऊळका पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. पोलीसांनी कलम १७४ नुसार गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरु आहे.