वाशिम : सत्यसाई संघटनेने राबविले दत्तक गावात स्वछता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 02:58 PM2018-01-17T14:58:25+5:302018-01-17T15:00:20+5:30

मालेगांव : सत्यसाईं संघटनेने  वाकळवाडी हे गाव दत्तक घेतले असून संघटना त्या गावी ठिकाणी विविध उपक्रम राबवित आहे. 

Washim: Cleanliness campaign in village by Satyasai Sanghatana | वाशिम : सत्यसाई संघटनेने राबविले दत्तक गावात स्वछता अभियान

वाशिम : सत्यसाई संघटनेने राबविले दत्तक गावात स्वछता अभियान

Next
ठळक मुद्देसत्यसाईं संघटनेने  वाकळवाडी हे गाव दत्तक घेतले असून संघटना त्या गावी ठिकाणी विविध उपक्रम राबवित आहे. सत्यसाईं संघटनेने  संपूर्ण गावात स्वछता अभियान राबवून साफसफाई केली. राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला त्यामुळे चांगलाच आधार मिळाला.


मालेगांव : सत्यसाईं संघटनेने  वाकळवाडी हे गाव दत्तक घेतले असून संघटना त्या गावी ठिकाणी विविध उपक्रम राबवित आहे.      सत्यसाईं संघटनेने  संपूर्ण गावात स्वछता अभियान राबवून साफसफाई केली. यामध्ये तालुक्यातील सत्यसाईं संघटने चे पदाधिकारी आणि गावातील युवक मंडळीसह महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला त्यामुळे चांगलाच आधार मिळाला.

याअभियानांतर्गत संपुर्ण वाकलवाडी या आदीवासी गावातील  नागरिकांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले आदिंसह गावातील युवक व ज्येष्ठांनी हातात झाडून घेऊन गावभरात सफाई अभियान राबविले. स्वच्छ भारत, सुंदर भारतचा संदेश देत घरोघरी शौचालय बांधून त्याचा वापर करीत गाव हागणदरीमूक्त करण्याचे आवाहनही केले.                या उपक्रमात  यामधे डॉ राजाभाऊ घुगे ,भालेराव , विनोद कल्याणकर , सोपान बुढाळकर ,कीशोर तायडे, महेंद्र उम्बरकर , विजय आनकर ,  राजेश पवार , भागवत सोनोने , ईंगळे  व ब्राह्मनवाडा आणि वाकलवाडी येथील ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 


सत्यसाईं संघटना विविध सामाजिक ऊपक्रम राबवित असते . यापूर्वी भामटवाडी हे १०० टक्के आदिवासी गाव दत्तक घेऊन  ८० टक्के व्यसनमुक्त केले . आता वाकळवाडी हे गाव दत्तक घेऊन त्या ठिकाणी माता बाल सगोपन करुन मोफत प्रोटीन वाटप करण्यात येणार आहे .  रेन वाटर हार्वेस्टिंग तसेच   बाल विकास वर्ग , व्यसन मुक्ती केंद्र आदि उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

-डॉ राजाभाऊ घुगे, मालेगांव 

Web Title: Washim: Cleanliness campaign in village by Satyasai Sanghatana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.