Washim: भावना गवळींना विधान परिषदेची उमेदवारी; वाशिमात जल्लोष
By संतोष वानखडे | Updated: July 2, 2024 19:13 IST2024-07-02T19:12:29+5:302024-07-02T19:13:14+5:30
Washim News: माजी खासदार भावना गवळी यांना शिंदेसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल शहरातील पाटणी चौकात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. मंगरूळपीर शहरातही शिवसैनिकांनी जल्लोष केला.

Washim: भावना गवळींना विधान परिषदेची उमेदवारी; वाशिमात जल्लोष
- संतोष वानखडे
वाशिम - माजी खासदार भावना गवळी यांना शिंदेसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल शहरातील पाटणी चौकात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. मंगरूळपीर शहरातही शिवसैनिकांनी जल्लोष केला.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या भावना गवळी यांचे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत तिकीट कापले होते. त्यामुळे त्यांची नाराजी उघड झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी यांचा भविष्यात योग्य तो सन्मान केला जाइल, असे आश्वासन दिले होते. विधान परिषद निवडणूकीत शिंदेसेनेचे उमेदवार म्हणून गवळी यांचे नाव घोषित करीत मुख्यमंत्र्यांनी आश्वासनाची पूर्ती केली. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भावना गवळी यांनी मुंबई येथे उमेदवारी अर्ज दखल केल्याने पदाधिकारी आणि त्यांच्या चाहत्यांनी पाटणी चौकात जल्लोष केला.