वाशिम : प्रतिकुल हवामानाचा हळद उत्पादनावर परिणाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 04:23 PM2018-03-19T16:23:57+5:302018-03-19T16:23:57+5:30

वाशिम : इतर पिकांच्या तुलनेत अधिक कालावधीच्या हळद पिकाला पाण्याची देखील जास्त गरज भासते. यंदा मात्र प्रतिकुल हवामान आणि पाण्याच्या कमतरतेमुळे हळद उत्पादनावर थेट परिणाम झाला असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

Washim: adverse weather afected turmeric production! | वाशिम : प्रतिकुल हवामानाचा हळद उत्पादनावर परिणाम!

वाशिम : प्रतिकुल हवामानाचा हळद उत्पादनावर परिणाम!

googlenewsNext
ठळक मुद्देवाशिम, रिसोड, मालेगाव, मानोरा या तालुक्यांमध्ये हळद उत्पादकांची संख्या अधिक आहे. वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने आठवड्यातील दर गुरूवारी हळद खरेदीची व्यवस्था उभी केली आहे. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन आठवड्यात केवळ १६ क्विंटल हळद खरेदीसाठी आल्याची माहिती आहे.

वाशिम : इतर पिकांच्या तुलनेत अधिक कालावधीच्या हळद पिकाला पाण्याची देखील जास्त गरज भासते. यंदा मात्र प्रतिकुल हवामान आणि पाण्याच्या कमतरतेमुळे हळद उत्पादनावर थेट परिणाम झाला असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन आठवड्यात केवळ १६ क्विंटल हळद खरेदीसाठी आल्याची माहिती बाजार समिती संचालक राजू चौधरी यांनी सोमवारी दिली.
जिल्ह्यात सोयाबीन, तूर, गहू व हरभरा या पिकांसोबतच हळदीचे देखील विक्री उत्पादन घेतले जाते. मुख्यत: वाशिम, रिसोड, मालेगाव, मानोरा या तालुक्यांमध्ये हळद उत्पादकांची संख्या अधिक आहे. यामाध्यमातून दरवर्षी हळदीचे हजारो क्विंटल उत्पन्न घेतले जात आहे. काही शेतकºयांनी एकत्र येऊन शेतातून निघणाºया कच्च्या हळदीवर प्रक्रिया करण्यासाठी ठराविक यंत्रणाही खरेदी केली आहे. याशिवाय हळद विकण्यासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने आठवड्यातील दर गुरूवारी हळद खरेदीची व्यवस्था उभी केली आहे. मात्र, गतवर्षी घटलेले पर्जन्यमान, यंदा अल्पावधीतच कोरडे पडलेले सिंचन प्रकल्प आणि प्रतिकुल हवामानामुळे जिल्ह्यातील हळदीच्या सरासरी उत्पादनात घट आल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळेच गत दोन आठवड्यापासून बाजार समितीत खरेदीसाठी येणाºया हळदीचे प्रमाणही घटल्याची माहिती राजू चौधरी यांनी दिली.

हिंगोली, परभणीतूनही आवक घटली!
वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्य:स्थितीत हळदीला ७ ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटल दर दिला जात आहे. मात्र, विक्रीसाठी येणाºया हळदीचे प्रमाण घटले असून नजिकच्या हिंगोली आणि परभणी परिसरातून पुर्वी मोठ्या प्रमाणात हळद विक्रीसाठी यायची; परंतु उत्पादनच घटल्याने गेल्या दोन आठवड्यापासून परिणाम झाल्याचे राजू चौधरी यांनी सांगितले.

Web Title: Washim: adverse weather afected turmeric production!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.