शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : पक्षकाराची फसवणूक करणाऱ्या  वकिलास बुधवारपर्यंत पोलिस कोठडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 17:44 IST

वाशिम : पक्षकाराची फसवणुक करणाऱ्या  वकिलास न्यायालयाने बुधवार, २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्दे अविनाश तायडे (पक्षकार) यांनी हिंगोली येथील वकील गोवर्धन मुळे यांना स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश न्यायालयीन कामकाजासाठी दिले होतेमात्र, या धनादेशावर वकिल मुळे यांनी ५ लाख ७० हजारांची रक्कम टाकून ते स्वत:च्या खात्यात वळते केले. ही रक्कम वाशिम येथील स्टेट बँकेतून १९ डिसेंबर २०१७ रोजी विड्रॉल झाल्याची फिर्याद तायडे यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती.

वाशिम : येथील न्यायालयात दाखल एका प्रकरणात धनादेश जमा करण्याच्या नावाखाली वकिलाने पक्षकाराकडून सही केलेले कोरे धनादेश घेतले. मात्र, त्यावर परस्पर ५ लाख ७० हजार रुपयांची रक्कम टाकून स्वत:च्या खात्यात रक्कम जमा करून पक्षकाराची फसवणुक करणाऱ्या  वकिलास न्यायालयाने बुधवार, २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित वकिलाविरूद्ध १८ फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला होता. कनेरगाव नाका (जि. हिंगोली) येथील अविनाश तायडे (पक्षकार) यांनी हिंगोली येथील वकील गोवर्धन मुळे यांना स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश न्यायालयीन कामकाजासाठी दिले होते. मात्र, या धनादेशावर वकिल मुळे यांनी ५ लाख ७० हजारांची रक्कम टाकून ते स्वत:च्या खात्यात वळते केले. ही रक्कम वाशिम येथील स्टेट बँकेतून १९ डिसेंबर २०१७ रोजी विड्रॉल झाल्याची फिर्याद तायडे यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. त्यावरून पोलीसांनी मुळे यांना अटक करून न्यायालयासमक्ष हजर केले असता, त्यांना न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले.

सोन्याची बनावट नाणी विकणाऱ्या  ‘त्या’ दोघांनाही पोलिस कोठडी सोन्याची बनावट नाणी तयार करून ती विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या  दोन आरोपींना पोलिसांनी १८ फेब्रुवारीला अटक केली. संबंधितांना न्यायालयासमक्ष हजर केले असता, दोघांनाही २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. लक्ष्मण मधुकर चव्हाण (वय ४० वर्षे, रा. पांगरखेडा, ता. मालेगाव) आणि शेरूप सत्तूजी चव्हाण (वय ४५ वर्षे, रा. सुकळी, ता. वाशिम) अशी आरोपींची नावे असून याप्रकरणी गजानन वामनराव वानखेडे यांनी वाशिम शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यात नमूद होते, की नमूद दोन्ही आरोपींनी आपणास बनावट सोन्याचे नाणे विकण्याचा प्रयत्न केला. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून आरोपींना बनावट ३१० नाण्यांसह अटक करून न्यायालयासमक्ष हजर केले असता, दोघांनाही २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमCrimeगुन्हाCourtन्यायालयPolice Stationपोलीस ठाणे