वाशिम : वकिलाकडून पक्षकाराची ५.७० लाखाने फसवणुक; गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 08:14 PM2018-02-18T20:14:50+5:302018-02-18T20:16:56+5:30

वाशिम : वाशिम येथील न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणामध्ये न्यायालयात धनादेश जमा करण्याच्या नावाखाली  वकिलाने पक्षकाराकडून सही केलेले कोरे धनादेश घेतले. सदर धनादेशावर ५ लाख ७० हजार एवढी रक्कम टाकून वकीलाने स्वत:च्या खात्यात जमा करून पक्षकाराची फसवणुक केली. याप्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशन मध्ये १८ फेब्रुवारीला वकिलाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. 

Washim: Rs 5.70 lakh fraud by a lawyer; Filing of complaints | वाशिम : वकिलाकडून पक्षकाराची ५.७० लाखाने फसवणुक; गुन्हे दाखल

वाशिम : वकिलाकडून पक्षकाराची ५.७० लाखाने फसवणुक; गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देन्यायालयात धनादेश जमा करण्याच्या नावाखाली वकिलाने पक्षकाराकडून सही केलेले कोरे धनादेश घेतलेसदर धनादेशावर ५ लाख ७० हजार एवढी रक्कम टाकून वकीलाने स्वत:च्या खात्यात जमा करून पक्षकाराची फसवणुक केली

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम येथील न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणामध्ये न्यायालयात धनादेश जमा करण्याच्या नावाखाली  वकिलाने पक्षकाराकडून सही केलेले कोरे धनादेश घेतले. सदर धनादेशावर ५ लाख ७० हजार एवढी रक्कम टाकून वकीलाने स्वत:च्या खात्यात जमा करून पक्षकाराची फसवणुक केली. याप्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशन मध्ये १८ फेब्रुवारीला वकिलाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. 
कनेरगाव नाका (जि. हिंगोली) येथील अविनाश रमेश तायडे (पक्षकार) यांनी हिंगोली येथील वकील गोवर्धन जयराम मुळे यांना स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश न्यायालयीन कामकाजासाठी विश्वासाने दिले होते. या धनादेशाचा न्यायालयीन कामकाजासाठी वापर न करता स्वत:च्या खात्यामध्ये ५ लाख ७० हजार एवढी रक्कम लिहून वापर केला. ही रक्कम वाशिम येथील स्टेट बँक मधून १९ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी १२:४३ वाजता मुळे यांच्या खात्यामध्ये वळती करण्यात आली. 
या घटनेची तायडे यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये १८ फेब्रुवारीला फिर्याद दाखल केली. पोलीसांनी मुळे यांना अटक केली असुन न्यायालयाने मुळे याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती तपास अधिकारी वाढवे यांनी दिली. 
 
Web Title: Washim: Rs 5.70 lakh fraud by a lawyer; Filing of complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.