वाशिम @ 43 सेल्सिअस

By Admin | Updated: May 25, 2014 00:08 IST2014-05-24T22:21:48+5:302014-05-25T00:08:23+5:30

वाशिम शहरातील तापमानाने आज दि.२४ रोजी ४३ अंश सेल्सिअस तापमानाचा पारा गाठला आहे.

Washim @ 43 Celsius | वाशिम @ 43 सेल्सिअस

वाशिम @ 43 सेल्सिअस

वाशिम: मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत चाललेल्या वाशिम शहरातील तापमानाने आज दि.२४ रोजी ४३ अंश सेल्सिअस तापमानाचा पारा गाठला आहे. वाशिम शहराच्या यावर्षी नोंदलेल्या तापमानापैकी हे यावर्षी नोंदलेले सर्वाधिक तापमान आहे. गतवर्षी एप्रिल व मे महिन्यात वाशिम मध्ये ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. यावर्षी येत्या पावसाळयापूर्वी तापमानाचा पारा अजून वाढणार काय याबाबत लोकांमध्ये भिती व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात झालेली गारपीट, त्यानंतरही एप्रिल व मे महिन्यात झालेला वादळी पाऊस व अधून मधुन ढगदाटून येऊन ढगाळ वातावरण तयार होण्यामुळे आतापर्यंत जास्त तापमानाची नोंद झाली नव्हती. २३ रोजी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची तर आज ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Web Title: Washim @ 43 Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.