वाकद ग्रामपंचायत जॉबकार्ड कार्यासाठी ठरली रिसोड तालुक्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:50 IST2021-09-10T04:50:20+5:302021-09-10T04:50:20+5:30
घरकुल योजनेसाठी ग्राम पंचायतमध्ये एकूण ९९२ लोकांचे नावे हे पंतप्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीमध्ये आले होते. तालुक्यात सर्वात जास्त ...

वाकद ग्रामपंचायत जॉबकार्ड कार्यासाठी ठरली रिसोड तालुक्यात प्रथम
घरकुल योजनेसाठी ग्राम पंचायतमध्ये एकूण ९९२ लोकांचे नावे हे पंतप्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीमध्ये आले होते. तालुक्यात सर्वात जास्त लक्ष होते तेव्हा आधार सेडिंग तर झाले होते पण जॉब सेडिंग बाकी होते. तेव्हा ४५७ लोकांचे जॉब कार्ड होते आणि ५३५ लोकांचे जॉबकार्ड काढणे बाकी होते. तेव्हा सरपंच अमोल देशमुख यांनी गावात दवंडी देऊन लोकांना सागून यांचे आधार कार्ड घेऊन सर्व फॉर्म जमा केले आणि पंचायत समिती गटविकास अधिकारी यांची भेट घेतली. गटविकास अधिकारी यांनी संगणक चालक मिलिंद खरात यांना जॉब कार्ड तयार करायचे सांगितले. तेव्हा खरात यांनी सांगितले पहिलेच तालुक्यातील वीस हजार फॉर्म आपल्याकडे पेंडिंग असल्याचे सांगितले. सरपंचांनी सदर कार्ड तयार करून घेण्याची व्यवस्था केली.