नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पीक कर्जावरील तीन महिन्याचे व्याज माफ
By Admin | Updated: March 28, 2015 01:48 IST2015-03-28T01:48:10+5:302015-03-28T01:48:10+5:30
राज्य शासनाच्या सहकार विभागाचा निर्णय.

नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पीक कर्जावरील तीन महिन्याचे व्याज माफ
खामगाव (बुलडाणा): नोव्हेंबर व डिसेंबर २0१४ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यात जिवीत व वित्त हानी झाली होती. या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान सहन कराव्या लागलेल्या शेतकर्यांना मदतीचा हात म्हणून पीक कर्जावरील तीन महिन्यांचे व्याज माफ करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या सहकार विभागाने याबाबतचा निर्णय २५ मार्च रोजी घेतला. गत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. त्यामुळे शेतीचे नुकसान मोठय़ा प्रमाणात झाले होते. हे नुकसार ज्या गावांमध्ये झाल्याचे जिल्हाधिकार्यांनी जाहीर केले, त्या गावातील बाधीत शेतकर्यांना ही सवलत लागू करण्यात येणार आहे. या शेतकर्यांच्या पीक कर्जावरील तीन महिन्यांचे व्याज माफ करून, ती रक्कम शासनामार्फत संबंधित बँकांना अदा करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने २६ मार्च रोजी घेतला.