ग्रामीण रुग्णालयाचे उपकेंद्र तीन वर्षापासून प्रतीक्षेत
By Admin | Updated: May 20, 2014 22:35 IST2014-05-20T22:23:16+5:302014-05-20T22:35:36+5:30
लोकसंख्येचे प्रमाण विचारात घेता या ठिकाणी प्राथमिक उपकेंद्राऐवजी ग्रामीण रुग्णालयाची मंजूरात मिळाली

ग्रामीण रुग्णालयाचे उपकेंद्र तीन वर्षापासून प्रतीक्षेत
अनसिंग : येथील लोकसंख्येचे प्रमाण विचारात घेता या ठिकाणी प्राथमिक उपकेंद्राऐवजी ग्रामीण रुग्णालयाची मंजूरात मिळाली त्याचबरोबर गावाचे क्षेत्रफळ व लोकसंख्या भरमसाठ असल्यामुळे गर्भवती महिलांना वेळेवर औषधपचार मिळावा या हेतुने चार वर्षापुर्वी दोन सुसज्ज अशा उपकेंद्राला जिल्हा परिषदेंअंतर्गत मान्यता मिळाली परंतु एकच उपकेंद्र प्रत्यक्षात कार्यवाही करुन सुरु करण्यात आले दुसर्याला मात्र अद्यापही मुहूर्त मिळाला नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन उपकेंद्राना चार वर्षापुर्वी मंजूरात मिळाली त्यानुसार त्याचा पाठपुरावा करुन एक उपकेंद्राचे बांधकाम प्रत्यक्षात सुरु करुन जवळपास १५ लाख रुपयाची सुसज्ज अशी इमारत उर्दु शाळेच्या बाजुला निर्माण करण्यात आली या उपकेंद्रामुळे त्या भागातील महिला वर्गांना आपल्या आरोग्याविषयी समस्या तथा गर्भवती अवस्थेत वेळोवेळी औषधोपचार व तपासणी करणे शक्य झाले आहे. त्या उपकेंद्रामुळे बहुतांश महिलांचे ग्रामीण रुग्णालयात जाणे व त्याच ठिकाणी त्यांना योग्य तपासणीची व्यवस्था उपलब्ध झाली. वास्तविक पाहता दुसर्या उपकेंद्रालाही त्याचवेळी मंजूरात मिळाली होती. पंरतु, त्याकडे सर्वांनी कानाडोळा केल्यामुळे ते मंजूर झालेले उपकेंद्र रखडले सदर उपकेंद्रासाठी वार्ड क्र. तीनमध्ये जागासुद्धा निश्चित करण्यात आली होती. सदर उपकेंद्राच्या कार्यवाही करिता संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.