चिखली जोडरस्त्याला मजबुतीकरणाची प्रतीक्षा
By Admin | Updated: September 7, 2014 22:44 IST2014-09-07T22:44:26+5:302014-09-07T22:44:26+5:30
मंगरुळपीर तालुक्यातील चिखली येथील रस्त्याची दुरवस्था.

चिखली जोडरस्त्याला मजबुतीकरणाची प्रतीक्षा
मंगरुळपीर : शेलूबाजार आठवडी बाजारात जाण्यासाठी अत्यंत सोईच्या चिखली झोलेबाबा ते आठवडी बाजार रस्त्याकडे संबधीतांचे दुर्लक्ष असल्याने बाजारकरू नागरिक ,व्यापारी, शेकतर्यांना मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावे लागत आहे.ही समस्या दुर करण्यासाठी लोकप्रतिनिधीने पुढाकार घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अकोला,शेलूबाजार येथुन मंगरूळपीरला जाण्यासाठी पुर्वी हाच रस्ता होता. परंतु काही काळानंतर या मार्गाला दूर लोटून अडाण नदीवर पुलाची निर्मिती करून बायपास काढण्यात आला. तेव्हा पासुन सदर रस्ता दुर्लक्षीत झाला. परंतु हा दुर्लक्षीत रस्ता बाजारकरू नागरिक, व्यापारी, शेतकरी तसेच सतीआई भक्तांसाठी अतिशय महत्वाचा आहे. तसेच मंगरूळपीर, मानोरा, वाशीम येथुन व्यापाराकरिता येणार्यांना हा रस्ता सोयीचा आहे.पावसाळय़ाचे दिवसात या मार्गावर ठिक ठिकाणी पाणी साचलेले असते. तसेच दोन ठिकाणी असलेल्या पुलाची अवस्था गंभीर आहे त्यामुळे पावसाळय़ात हा रस्ता वाहने येण्या जाण्या जोगा नसतो.पावसाळय़ाच्या दिवसात हा मार्ग वाहनाकरिता बंद असतो परिणामी शेलूबाजार चौकातील अतिक्रमणाच्या जाळय़ा तुन आठवडी बाजारात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अनेक वेळा चौकात वाहतुकीचा खोळंबा निर्माण होतो. त्यामुळे व्यापार्यांना आपली वाहणे तर शेतकर्यांना जनावरे घेवुन जाताना अत्यंत त्रासाचे झाले आहे.याबाबत आजपर्यंंत कोणीच पुढाकार घेतल्याचे दिसुन येत नाही. या रस्त्याची दुरूस्ती झाल्यास आठवडी बाजाराच्या दिवशी शेलूबाजार चौकात वाहतुकीचा होणारा खेळखंडोबा दुर होवुन व्यापारी, शेतकर्यासाठी सोईचा होवु शकतो म्हणुन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंर्तगत रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी शेलुबाजारसह परिसरातील जनतेतून होत आहे.